धार (मध्यप्रदेश) येथे हिंदु अल्पवयीन मुलीला धमकावणार्या फैजानला अटक
धार (मध्यप्रदेश) – येथे आदिवासी समाजातील हिंदु अल्पवयीन मुलीला धमकावणार्या फैजान नावाच्या धर्मांधाला नुकतीच अटक करण्यात आली. पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, फैजानने पीडितेशी मैत्री करून नंतर तिच्यासमवेत काही छायाचित्रे काढून व्हिडिओही बनवला. फैजानचा वाईट हेतू लक्षात येताच पीडितेने त्याच्याशी बोलणे बंद केले. पुढे पीडितेच्या कुटुंबियांनी तिचा विवाह एका हिंदूशी केला, तेव्हा फैजानने वरील छायाचित्रे तिच्या पतीला पाठवली. यानंतर तिने नसारपूर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी फैजानला अटक केली.
संपादकीय भुमिकायावरून मध्यप्रदेशमध्ये धर्मांधांना लव्ह जिहादविरोधी कायद्याचाही धाक उरला नसल्याचे सिद्ध होते ! यासाठी सरकारने हा कायदा आणखी कडक केला पाहिजे ! |