तीर्थ प्राशन केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘देवळात देवतेचे दर्शन घेतल्यावर पुजारी आपल्याला तीर्थ-प्रसाद देतात. देवळातील तीर्थ-प्रसाद ग्रहण केल्याने मनाला प्रसन्नता जाणवते. देवपूजा, धार्मिक विधी इत्यादी प्रसंगीही आपण तीर्थ-प्रसाद ग्रहण करतो. तीर्थ-प्रसाद ग्रहण करतांना देवतेप्रती आपला कृतज्ञताभाव जागृत होतो. (प्रसाद ग्रहण केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे यासंदर्भातील संशोधन निराळ्या लेखात दिले आहे.)
रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेने घटस्थापनेपासून दसर्यापर्यंत प्रतिदिन यज्ञयाग करण्यात आले. या यज्ञातील तीर्थ साधकांना प्राशन करण्यासाठी देण्यात आले. ‘तीर्थ प्राशन केल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी तीर्थ प्राशन करण्यापूर्वी आणि ते प्राशन केल्यानंतर ५ मिनिटांनी ४ साधिकांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे. यातून तीर्थामुळे लाभ कसा होतो ? ते लक्षात येईल.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंतयु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंतया लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
१ अ. तीर्थ प्राशन केल्यानंतर साधिकांतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : तीर्थ प्राशन करण्यापूर्वी साधिकांमध्ये नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा होत्या. त्यांनी तीर्थ प्राशन केल्यानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ अल्प होऊन सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. हे पुढे वर दिलेल्या सारणीतून लक्षात येत.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. यज्ञातील चैतन्यमय तीर्थ प्राशन केल्याने साधिकांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : नवरात्रीत प्रतिदिन यज्ञ
करण्यात आले. यज्ञातील चैतन्यमय वातावरणामुळे यज्ञाच्या ठिकाणी ठेवलेले कलशातील तीर्थ सात्त्विकतेने भारित झाले. साधिकांनी हे चैतन्यमय तीर्थ प्राशन केल्याने त्यांच्यातील त्रासदायक स्पंदने पुष्कळ प्रमाणात अल्प होऊन सकारात्मक ऊर्जा, म्हणजे त्यांची सात्त्विकता पुष्कळ वाढली. यातून ‘तीर्थ प्राशन केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतात’, हे लक्षात येते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.१२.२०२२)
ई-मेल : mav.research2014@gmail.com