हिंदु कोळ्यांकडून हलालप्रेमी मुसलमान मासे खरेदी करण्यास टाळतात !
मुसलमान जिवंत मासे ‘हलाल’ पद्धतीने कापूनच खातात !
(टीप : ‘हलाल’ म्हणजे पशूला हळूहळू ‘कलमा’ म्हणत कापले जाते. मारलेला पशू आधी अल्लाला देतात आणि मग त्याचे उष्टे म्हणून ते नंतर खातात.)
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुसलमानांच्या ‘हलाल’ पद्धतीला हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे. हिंदुत्वनिष्ठ सघटनांनी आंदोलन करून ‘हलाल’ मटण तसेच, ‘हलाल’ प्रमाणित वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदूंना ‘हलाल’ मांस खाण्यास, तसेच ‘हलाल’ प्रमाणित वस्तू खरेदी करण्याला भाग पाडणारे मुसलमान मात्र हिंदूंकडून कधीही मांस खरेदी करत नाहीत.
हिंदुत्वनिष्ठांनी मुसलमानांकडून ‘हलाल’ पद्धतीच्या मटण विक्रीलाही तीव्र विरोध दर्शवून हिंदूंच्या ‘झटका’ पद्धतीने कापलेले मटण हिंदूंनी खरेदी करावे, असे आवाहन हिंदूंना केले आहे. इस्लाम पंथानुसार मुसलमान लोकांना केवळ ‘हलाल’ मांसच खाण्याची अनुमती आहे. त्यामुळे ‘मुसलमान जिवंत मासे आणून त्यांना ‘हलाल’ पद्धतीने कापून मगच शिजवतो’, असे एका मुसलमानाने सांगितले.
‘झटका’ मटण पद्धत काय आहे ?
हिंदूंचे काही सण आणि जत्रा येथे हिंदु प्रथेनुसार बोकडाचा बळी दिला जातो. बोकडाचा बळी देतांना एका झटक्यात बोकडाची मान कापली जाते. त्यामुळे त्याला ‘झटका’ पद्धत असे म्हणतात. या पद्धतीत सुरीने पशूची मान एका झटक्यात कापली जाते. त्यामुळे तेथे पशु तडफडून मरत नाही. ‘झटका’ पद्धतीने मटण विकणे बंद होत असल्याने हिंदूंना मुसलमानांच्या ‘हलाल’ पद्धतीचे मटण खरेदी करावे लागत आहे.