उल्हासनगर येथील १ सहस्र अनधिकृत इमारती अधिकृत होणार !
ठाणे – उल्हासनगर येथील १ सहस्र अनधिकृत इमारती अधिकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २० डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
उल्हासनगर येथे लाखो कुटुंब हे अनधिकृत इमारतींमध्ये रहात आहेत. या इमारतींना दंड आकारून त्या नियमित करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित होता. अखेर राज्य सरकारने हा विषय मार्गी लावला आहे. यामध्ये संबंधितांना प्रति चौ. फूट २ सहस्र २०० रुपये दंड भरावा लागणार आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरमध्ये इमारतींचा पुनर्विकास होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|