नोकरी किंवा व्यवसाय करतांना आलेले चांगले किंवा कटू अनुभव कळवा !
साधकांना सूचना आणि वाचकांना नम्र विनंती !
समाजात नोकरी किंवा व्यवसाय करतांना आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये चांगले किंवा कटू अनुभव येत असतात. आपल्यालाही पुढीलप्रमाणे अनुभव आले असतील.
१. शासकीय कार्यालयांमध्ये नोकरी करतांना कधी आपल्याला प्रामाणिक आणि निरपेक्षपणे साहाय्य करणारे अधिकारी किंवा कर्मचारी भेटतात. त्याचप्रमाणे ‘काही अधिकारी लाच मिळाली, तरच काम करतात’, असे आपण अनुभवलेले असते.
२. कधी आपल्याला शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देण्याची तळमळ असणारे काही अधिकारी किंवा कर्मचारी भेटतात. त्याचप्रमाणे कधी शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ देतांना त्यांना वेठीस धरणारे अधिकारी किंवा कर्मचारी भेटतात.
३. आपण खासगी आस्थापनात नोकरी करत असतांना, त्या आस्थापनाचे मालक प्रामाणिकपणे आणि ग्राहकहित जोपासून व्यवसाय करणारे असतात, तर काही जण अवैध मार्गाने धन मिळवणारे किंवा ग्राहकांची लूट करणारे असतात, असा आपल्याला अनुभव आलेला असतो.
४. आपण शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी असतांना आपल्यावर अनियमित कामे नियमित करण्यासाठी किंवा भ्रष्टाचार करण्यासाठी कुणी दबाव आणलेला असतो. त्या वेळी आपण असा प्रयत्न करणार्यांच्या विरुद्ध वैध मार्गाने लढा दिलेला असतो.
आपल्याला वरीलप्रमाणे किंवा अन्य प्रकारचे चांगले अथवा कटू अनुभव आले असतील, तर आम्हाला अवश्य कळवा. आपल्या अनुभवांतून इतरांना शिकण्याची संधी मिळेल. चांगल्या अनुभवांतून समाजातील चांगल्या प्रवृत्तींच्या लोकांविषयी माहिती मिळून समाजव्यवस्थेची चांगली बाजू समजण्यास साहाय्य होईल. तसेच कटू अनुभवांतून ‘वैध मार्गाने उपाययोजना कशी काढता येऊ शकते ?’, याची दिशा मिळण्यासही साहाय्य होईल.
हे अनुभव प्रसिद्ध करतांना आपल्याला ‘आपले नाव छापू नये’, असे वाटत असल्यास आपण तसे आम्हाला कळवू शकता. आपले नाव गोपनीय ठेवले जाईल.
आपले अनुभव पुढील पत्त्यावर कळवावे.
सुराज्य अभियान
टपालाचा पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, ‘सुखठणकर रिट्रिट’, फ्लॅट क्र. एजी-४, चित्तार भाट, नागेशी, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
संपर्क क्र. – ७७३८२३३३३३
संगणकीय (ई-मेल) पत्ता – socialchange.n@gmail.com