लव्ह जिहादचे वास्तव : प्रेमाचे आमीष ते श्रद्धा वालकरचे तुकडे करण्यापर्यंत !
११ आणि १८ डिसेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘जिहाद ते लव्ह जिहाद आणि त्यासाठी केल्या जाणार्या क्लृप्त्या, ‘माझा अब्दुल तसा नाही’, ही हिंदु तरुणींची धोकादायक मानसिकता, विदेशातही लव्ह जिहाद आणि प्रेम असेल, तर धर्मांतराची आवश्यकता का ? ’, आदी सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत. (भाग ३)
१३. लव्ह जिहादमुळे हिंदु संस्कृतीचा वंश वाढणे नेहमीसाठी बंद होणे
लव्ह जिहादी हिंदु मुलींच्या पोटी मुले जन्माला घालून इस्लामचा विस्तार करत आहेतच; परंतु आपण हे विसरत आहोत की, एका हिंदु मुलीने मुसलमान बनणे, म्हणजे तिच्याकडून अनेक पिढ्यांपासून चालत आलेले हिंदु संस्कार आणि हिंदु वंशाची ‘जीन बँक’ नेहमीसाठी नष्ट होणे आहे. राजमाता जिजाऊ यांच्या गर्भातूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार् या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होऊ शकतो. त्याच्या तुलनेत २-३ पिढ्यांपूर्वी हिंदु असलेले बॅरिस्टर महंमद अली जीना, फारूख अब्दुल्ला आदींनी ज्या प्रकारे भारतमातेला हानी पोचवली आहे, त्याचा अनुभव आपण आताही घेत आहोत.
१४. भारतात झालेल्या लव्ह जिहादच्या घटना आणि त्यांचे भयानक परिणाम
भारतात वाढत असलेल्या लव्ह जिहादच्या काही घटनांच्या संदर्भात आपण निश्चितच माध्यमांकडून वाचले असेल. विश्व हिंदु परिषदेने तर अशा प्रकारच्या ४०० हून अधिक घटनांची सूचीच प्रकाशित केली आहे. ही सूची केवळ पोलीस ठाणे आणि वृत्तपत्रे यांच्यापर्यंत पोचलेल्या घटनांची असू शकते; कारण १० पैकी २-३ प्रकरणांमध्येच हिंदु युवतीचे आई-वडील पोलीस ठाण्यात जाण्याचे धैर्य दाखवू शकतात. अन्य आई-वडील तर समाजात होणारी मानहानी आणि कायदेशीर प्रक्रिया यांच्या भयाने पोलीस ठाण्यात जातच नाहीत. त्यामुळे त्यांची माहिती कोणत्याही सरकारपर्यंत पोचत नाही. श्रद्धा वालकरचे प्रकरणही याच श्रेणीत येते. श्रद्धाच्या हत्येनंतर ६ मासापर्यंत या घटनेची माहिती कुणालाही समजली नव्हती. तिच्या मित्राला संशय आल्याने त्याने तिच्या वडिलांना सांगितले आणि त्यानंतर अन्वेषणाला प्रारंभ झाला. श्रद्धाचे प्रकरण वृत्तपत्रांमध्ये आल्यानंतर २-४ दिवसांतच अनेक हिंदु मुलींच्या हत्यांच्या घटना समोर यायला लागल्या. यावरून लव्ह जिहादची वाढती तीव्रता आणि भयंकर परिणाम यांचा अंदाज आपण लावू शकतो. झारखंडसारख्या मागास वनवासी राज्यातही लव्ह जिहाद जोरात चालू आहे. तेथे केवळ १५ दिवसांतच लव्ह जिहादची ४ प्रकरणे समोर आली. उदाहरणासाठी ते समजून घेऊया.
अ. झारखंडमध्ये १२ व्या वर्गात शिकणार् या अंकिता सिंह हिने प्रेम करण्यास नकार दिल्यावर शाहरूखने पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले.
आ. झारखंडमध्येच आफताब अंसारी याने ‘पुष्पेंद्र सिंह’ या खोट्या नावाने पूजा सिंहशी लग्न केले. त्यांना मुलगी झाल्यावर तो दोघांनाही सोडून बेपत्ता झाला.
इ. फकरूद्दीन नावाच्या धर्मांधाने एका वनवासी मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केले.
ई. लोहदरगामध्ये रब्बानी अंसारी याने ‘साजन उरांव’ या खोट्या नावाने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिला विहिरीत ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
उ. याच झारखंडची राजधानी रांचीमध्ये वर्ष २०१४ मध्ये राष्ट्रीय रायफल नेमबाज तारा सचदेव हिच्याशी रकिबुल हसन या धर्मांधाने ‘रंजीत कोहली’ असे खोटे नाव सांगून लग्न केले. त्यानंतर धर्मांतरासाठी तिच्याशी जनावरासारखी बळजोरी केली. ताराने मुसलमान बनण्यास नकार दिल्यावर तिला कुत्र्यांच्या पिंजर्यात टाकले आणि त्याच्याकडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर तो ताराच्या भावाला ठार मारण्याच्या धमक्या देऊ लागला. वर्ष २०१५ मध्ये हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे अन्वेषणासाठी गेले. एका राष्ट्रीय नेमबाज युवतीशी होत असलेले एवढे मोठे षड्यंत्र उघड होऊनही ‘लव्ह जिहाद’विषयी हिंदु समाजात जागरूकता फारच अल्प दिसून येते.
१५. झारखंडमध्ये लव्ह जिहादच्या माध्यमातून वनवासींच्या भूमी कह्यात घेण्याचे षड्यंत्र
झारखंडमध्ये बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे (पी.एफ्.आय.चे) सदस्य अत्यंत मागास भागातील वनवासी मुली आणि महिला यांच्याशी लग्न करत आहेत. यामागे लग्नाच्या आडून वनवासींची भूमी आणि मन यांवर ताबा मिळवणे, हे षड्यंत्र आहे. आदिवासी आणि अल्पसंख्यांक यांच्या नावावर विद्रोह उभा करणे, अशीही त्यांची नवीन योजना आहे. गुप्तचर विभागाच्या सूत्रानुसार ‘पी.एफ्.आय.’च्या सदस्यांनी वनवासी महिला आणि मुली यांच्याशी लग्न केल्याची १ सहस्र प्रकरणे समोर आली आहेत. यातील अधिकांश प्रकरणे पाकूर जिल्ह्यातील आहेत. वनवासी जमातीच्या युवतींशी फसवून लग्न करणे आणि नंतर त्यांच्यामार्फत वनभूमी कह्यात घेणे, हा त्यांचा उद्देश आहे. हा एक प्रकारे लव्ह जिहादच्या आडून लँड (भूमी) जिहादच आहे.
१६. नागालँडमध्ये लव्ह जिहादच्या माध्यमातून जमातींच्या भूमी कह्यात घेण्याचा केला जाणारा प्रयत्न
नागालँडमध्ये काम करण्यासाठी येणारे बांगलादेशी मुसलमान आदिवासीचा दर्जा मिळवून देण्यासाठी नागा मुलींना फूस लावून त्यांच्याशी लग्न करतात, असा तेथील स्थानिक जमातींचा मुख्य आरोप आहे. त्याचे प्रमाण एवढे अधिक आहे की, आता ‘सेमा’ किंवा ‘सुमी’(जमात)ची मुलगी आणि बंगाली मुसलमान पुरुष यांच्यातील लग्नांमुळे ‘सुनिया’ नावाची नवीन नागा जमात निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने वर्ष २०१५ मध्ये एका नागा मुलीवर बलात्कार करणार्या सईद फरीद या बांगलादेशी भंगारच्या व्यापार्याची पोलीस ठाण्यातून बाहेर ओढून हत्या केली होती.
१७. केरळमध्ये लव्ह जिहादच्या माध्यमातून जिहादी आतंकवाद्यांची भरती करण्याचे जागतिक षड्यंत्र
‘लव्ह जिहाद’ हा शब्द समोर येताच सर्वप्रथम केरळ राज्याचे नाव समोर येते. सर्वांत आधी केरळ आणि मंगळुरू (कर्नाटक) येथील किनारी भागात लव्ह जिहाद चालू करण्यात आल्याचा आरोप झाला होता.
पोन्नानी (केरळ) येथे लव्ह जिहादच्या माध्यमातून फसवण्यात आलेल्या हिंदु-ख्रिस्ती आदी युवतींच्या धर्मांतराचे केंद्र बनवण्यात आले होते. वर्ष २०१० मध्ये केरळचे साम्यवादी पक्षाचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही.एस्. अच्युतानंदन् यांनी ‘केरळ राज्याला लव्ह जिहादपासून धोका आहे’, असा दावा केला होता.
‘२० वर्षांमध्ये केरळ मुसलमानबहुल होईल’, यासाठी काही संघटना काम करत आहेत. त्या संघटनांकडून मुसलमान युवकांना पैसे दिले जात आहेत. त्या माध्यमातून अन्य मुलींना इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याची प्रलोभने दाखवली जात आहे. ‘पी.एफ्.आय.’ आणि ‘कॅम्पस फ्रंट’ यांसारख्या मुसलमान संघटनांवर लव्ह जिहादच्या कारवायांना प्रोत्साहन देण्याचा आरोप करण्यात आला आहे.
केरळच्या सायरो-मालाबार चर्चनुसार ‘लव्ह जिहादमध्ये ख्रिस्ती महिलांना लक्ष्य करण्यात येत आहे त्यांना आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये भरती करण्यात येत आहे, त्यांना ‘सेक्स स्लेव्ह’ (संभोगासाठी गुलाम) बनवण्यात येत आहे, तसेच त्यांना ठार मारण्यात येत आहे.’ याविषयी अधिक माहिती देतांना चर्चचे प्रमुख कार्डिनल मार जार्ज एलेनचेरी यांनी काढलेले परिपत्रक रविवारच्या प्रार्थनासभेत अनेक वेळा वाचण्यात आले. याखेरीज ‘केरळ कॅथॉलिक बिशप्स कॉन्फरन्स’ (केसीबीसी) ने दावा केला की, वर्ष २००५ ते २०१२ या कालावधीत लव्ह जिहादची ४ सहस्र उदाहरणे होती. हे खरे की, लव्ह जिहाद हा नियोजनपूर्वक कार्यवाहीत आणण्यात आणि त्या माध्यमातून ख्रिस्ती मुलींना लक्ष्य करण्यात येत आहे. ‘इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या २१ लोकांपैकी अर्धे ख्रिस्ती धर्मांतरित होते’, असे पोलिसांनी म्हटले आहे. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे.
ज्या ४ भारतीय महिला त्यांच्या पतींसमवेत इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी खुरासान प्रांतात (इराण) गेल्या होत्या, त्या सध्या अफगाणिस्तानच्या कारागृहात बंद आहेत. केरळच्या या सर्व महिलांनी वर्ष २०१६ ते २०१८ मध्ये अफगाणिस्तानमध्ये प्रवास केला होता. त्यांचे पती अफगाणिस्तानमध्ये निरनिराळ्या आक्रमणात मारले गेले. त्या महिलांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१९ या मासांमध्ये अफगाणिस्तानच्या अधिकार्यांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्या आता सरकारला भारतात परतण्याची अनुमती मागत आहेत. यातून स्पष्ट होते की, लव्ह जिहाद काल्पनिक नाही. धर्मांध लव्ह जिहादमध्ये फसलेल्या अन्य धर्मीय युवतींना जिहादी बनवण्याचेही कार्य करत आहेत.
१८. म्यानमारमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात ‘९६९’ आंदोलन
म्यानमारमध्ये ‘९६९’ एक बौद्ध राष्ट्रवादी आंदोलन होते, जे प्रामुख्याने बौद्ध म्यानमारमध्ये इस्लामच्या विस्ताराच्या विरोधात आहे. ९६९ चे तीन अंक ‘बौद्ध, बौद्ध प्रथा आणि बौद्ध समुदाय या गुणांचे प्रतीक आहेत. पहिला ९ अंक हा बुद्धाचे ९ विशेष गुण आणि ६ अंक त्यांचे धर्म किंवा बौद्ध शिक्षणांचे ६ विशेष गुण यांसाठी आहे आणि शेवटचा ९ अंक बौद्ध संघाच्या (मठवासी समुदायाच्या) ९ विशेष गुणांचे प्रतिनिधीत्व करतात.
विविध पाश्चात्त्य माध्यम संघटनांनी या आंदोलनाला मुसलमानविरोधी किंवा ‘इस्लामोफोबिक’ म्हटले आहे. हे आंदोलन मुसलमानविरोधी असल्याचे म्यानमार बौद्ध समर्थकांनी नाकारले आहे. या आंदोलनाचे प्रमुख भिक्खु विराथु होते. ते म्हणाले, ‘‘हे बंगालींना लक्ष्य करण्याविषयी एक सुरक्षात्मक आंदोलन आहे, जे जातीय रखईन (बौद्ध) यांना भयभीत करत आहेत. मुसलमान पुरुष बौद्ध असल्याचे ढोंग करतात आणि नंतर म्यानमारमध्ये बौद्ध महिलांना इस्लाममध्ये आकर्षित करतात. त्यांनी कायदा बनवून ‘बौद्ध महिलांना लव्ह जिहादपासून वाचवा’, अशी आग्रहाची मागणी केली आहे.
१९. लव्ह जिहाद थांबवण्यासाठी मुलींना हिंदूंचा इतिहास आणि महाराणी पद्मावतीने केलेले बलीदान सांगणे आवश्यक !
जोपर्यंत भारतात सध्याची कायदेव्यवस्था, शिक्षणव्यवस्था आणि अंध धर्मनिरपेक्षता राहील, तोपर्यंत लव्ह जिहादची समस्या दूर होणे कठीण आहे. आज कुटुंबात सर्व एकत्र रहातात; परंतु प्रत्येक जण कुणाचेही न ऐकता स्वतंत्र विचाराने वागतो. त्यामुळे आपल्या मुलींना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे जीवन, तसेच छत्रपती संभाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मावती यांनी धर्मासाठी केलेला गौरवपूर्ण त्याग सांगावा लागेल. यासाठी आपल्या मुलींशी मोकळेपणाने बोलले पाहिजे. तेव्हाच त्यांना त्या हिंदु असल्याचा अभिमान वाटेल. जोधाबाई-अकबरच्या प्रेमाच्या खोट्या गोष्टी नाहीत, तर राणी पद्मावती आणि हाडी राणी इत्यादी विरांगनांनी धर्मासाठी केलेले बलीदान सांगितले पाहिजे.
बंधूनो, इतिहासाचा एक काळ होता, जेव्हा राणी पद्मावतीने मुसलमान शासक अल्लाउद्दीन खिलजीची बेगम (पत्नी) होऊन जगण्यापेक्षा जोहार करून अग्नीत जळून मरणे पसंत केले होते. या जोहारमध्ये ती एकटी नव्हती, तर तिच्या समवेत १ सहस्र ६०० क्षत्रिय स्त्रियांनीही जोहार केला होता. सार्वजनिक स्वरूपात महिलांनी विशाल अग्नीकुंडात जिवंतपणी प्रवेश करून शरिराला भस्म करण्याच्या प्रक्रियेला ‘जोहार’ म्हटले जाते. जोहारविषयी कोणताही सामान्य मनुष्य विचारही करू शकत नाही; परंतु भारत हा एकमेव देश आहे की, येथील महिलांमध्ये बलीदानाची भावना आणि धैर्य रोमारोमांत भिनलेले आहे. ऐतिहासिक युगात राजा आणि महाराजा यांच्या ज्या ज्या राजपूत महिलांनी जोहार केला, त्या विरांगनांची नावे इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यात आली आहेत की, जी आजही अमर आहेत.
मोगलांच्या काळात परकियांकडून भारतावर आक्रमणे होत होती, त्याच काळात येथे जोहारच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. जोहार करण्यामागील कारण असे की, अधिकांश मुसलमान आक्रमक स्त्रियांना लुटून त्यांचे शीलभंग करत होते. तसेच त्यांना ‘सेक्स स्लेव्ह’ बनवून मीनाबाजारामध्ये विकत होते. यातून वाचण्यासाठी आधी हिंदु महिला विष खाऊन आत्महत्या करायच्या; परंतु मोगलांचे विकृत सैन्य त्यांच्या मृतदेहांचीही विविध पद्धतीने विटंबना करायचे. त्यामुळे त्या जोहारच्या अग्नीत प्रवेश करून स्वतःच्या सुंदर देहाला पंचतत्त्वात विलीन करत होत्या आणि इतिहासाच्या पानांमध्ये नेहमीसाठी अमर होत होत्या.
हा काळ आठवला, तर मुसलमान आक्रमकांची मानसिकता आणि शीलरक्षणासाठी बलीदान करणार्या आपल्या हिंदु विरांगनांची मानसिकता लक्षात येऊ शकते. जर हिंदु स्त्रियांच्या दृष्टीने शीलरक्षणाचे एवढे महत्त्व आहे, तर मग आज आमच्या भगिनी आधुनिकतेमुळे कुण्या अब्दुल, सलीम, सलमान यांच्या मागे लागून त्यांच्या हाताचे बाहुले बनणे पसंत का करत आहेत ? म्हणून त्यांना लव्ह जिहादच्या भयंकर परिणामांविषयी अवगत करा, तसेच त्यांना आपल्या वीरमाता आणि वीरपुरुष यांचे स्मरणही करायला सांगा.’ (समाप्त)
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती. (५.१२.२०२२)
लव्ह जिहादला रोखण्यासाठी ‘निकिता कायदा’ सिद्ध व्हायला हवा !
लव्ह जिहाद मुळात भारतात नव्हे, तर लंडनमध्ये ‘रोमिओ जिहाद’ नावाने वर्ष २००९ पासून चालू आहे. हिंदु युवती मुसलमान युवकाच्या प्रेमात पडली, तर चालते. मग राहुल राजपूतसारखा हिंदु युवक एखाद्या मुसलमान युवतीवर प्रेम करत असेल, तर त्याला का मारले जाते ? तेव्हा कुठे जातो तुमचा ‘सेक्युलरवाद (निधर्मीपणा)’ ? निकिता तोमर आणि तिच्यासारख्या मुलींना न्याय देण्यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र यायला हवे. लव्ह जिहादला रोखण्यासाठी ‘निकिता कायदा’ सिद्ध व्हायला हवा.
निकिता तोमर प्रकरणी ‘सुदर्शन न्यूज’ने लव्ह जिहाद विरोधात कायदा व्हावा, यासाठी ‘इंडिया गेट’ जवळ मोर्चा काढला होता. त्या मोर्च्यावर एका धर्मांध पोलीस अधिकार्याने लाठीमार केला. या घटनेचा आम्ही निषेध करतो. जर कुणी हिंदु न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरत असेल, तर त्याच्यावर लाठीमार का ?
– श्री. रमेश शिंदे (१५.४.२०२१)
संपादकीय भूमिकाहिंदु मुलींना जोधाबाई-अकबरच्या प्रेमाच्या खोट्या गोष्टी नव्हे, तर राणी पद्मावतीसारख्या विरांगनांनी धर्मासाठी केलेले बलीदान सांगा ! |