जगातील ५०० प्रभावशाली मुसलमानांच्या सूचीमध्ये भारतातील झाकीर नाईकचे नाव !
जॉर्डन देशातील अशासकीय संस्थेची सूची !
नवी देहली – जॉर्डन देशातील ‘रॉयल ऑल अल्-बायत इन्स्टिट्यूट फॉर इस्लामिक थॉट’ (रॅबिट) या अशासकीय संस्थेने जगातील ५०० प्रभावशाली मुसलमान व्यक्तींची सूची घोषित केली आहे. यात भारत आणि बांगलादेश येथील जिहादी आतंकवाद्यांसाठी आदर्श असणार्या आणि भारतातून पलायन कराव्या लागलेला झाकीर नाईक याचाही समावेश करण्यात आला आहे. यासह भारतातील एकूण ५० मुसलमानांचा यात समावेश आहे. ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष मौलाना महंमद मदनी १५ व्या क्रमांकावर आहेत. मदनी यांना ‘मॅन ऑफ द इयर’ (वर्षातील सर्वोत्तम व्यक्ती) देखील घोषित करण्यात आले आहे. या सूचीत अभिनेते आमीर खान, अभिनेत्री शबाना आझमी, एम्.आय.एम.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी आदींची नावे आहेत. या अहवालामध्ये भारतावर ‘लव्ह जिहाद’वरून टीका करण्यात आली आहे. सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज अल् सौद यांचा या सूचीमध्ये पहिला क्रमांक आहे, तर इराणचे अयातुल्ला अली खामेनी दुसर्या क्रमांकावर आहेत.
dhAmman: The list of 500 most influential Muslim personalities in the world has been released. Many people from India are also included in this list. # # # # # # # #https://t.co/JFwCP1RfGP
— SK Today’s News (@sktodaysnews) December 23, 2022
संपादकीय भूमिका
|