धर्मावरील आघातांविरुद्ध सांगलीत १० सहस्र हिंदूंची सिंहगर्जना !
-
लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदु देवतांचे विडंबन आदींविरुद्ध कठोर कायद्यांची मागणी
-
हिंदु युवती आणि महिला यांची लक्षणीय उपस्थिती !
सांगली, २४ डिसेंबर (वार्ता.) – लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, हिंदु देवता आणि संत यांचे विडंबन अन् सामाजिक तेढ यांच्या विरोधात कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी सांगलीत २४ डिसेंबरला भव्य ‘हिंदु गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चात १० सहस्रांहून अधिक हिंदूंनी सहभाग घेतला होता.
मोर्चासाठी हिंदु युवती आणि महिला यांची लक्षणीय उपस्थिती होती. श्रीराम मंदिरापासून मोर्चाचा प्रारंभ झाला. यानंतर शिवतीर्थ, राजवाडामार्गे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात मोर्चाची सांगता झाली. मोर्चाच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
मोर्चासाठी भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ, खासदार श्री. संजयकाका पाटील, नगरसेविका सौ. संगिता खोत, अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, सौ. उर्मिला बेलवलकर, अनिता व्हनखंडे, नगरसेवक श्री. पांडुरंग कोरे, श्री, लक्ष्मण नवलाई, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव श्री. पृथ्वीराज पवार, श्री. श्रीकांत शिंदे, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. नितीन चौगुले, अधिवक्ता वासुदेव ठाणेदार, अधिवक्ता बाळासाहेब देशपांडे, हिंदुत्वनिष्ठ श्री. विकास सूर्यवंशी, तासगाव येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सिद्धेश्वर लांब, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई, श्रीमती मधुरा तोफखाने आणि शिवसेना (उद्घव ठाकरे गट) कार्यकर्ते.
सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर, सौ. संपदा पाटणकर या हिंदुत्वनिष्ठांसह विविध गणेशोत्सव आणि सामाजिक मंडळांचे कार्यकर्ते, तसेच राष्ट्र सेविका समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, हिंदु एकता आंदोलन, भाजप, शिवसेना (शिंदे गट) या संघटना अन् पक्षही सहभागी झाले होते.
क्षणचित्रे१. पटेल आणि मारवाडी समाजातील लोक त्यांची दुकाने बंद ठेवून या मोर्चात सहभागी झाले होते. |