धर्मशिक्षणाची अपरिहार्यता !
उत्तरप्रदेशमध्ये कमला नेहरू पूर्व माध्यमिक विद्यालय या सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांकडून ‘मेरे अल्ला’ ही मदरशांतील प्रार्थना करवून घेण्यात येत होती. ‘मेरे अल्ला’ म्हणण्यास नकार देणार्या विद्यार्थ्यांना धमकी दिली जायची. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक नाहिद सिद्दीकी यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शिक्षणमित्र वजरूद्दीन यांची चौकशी करण्यात येणार आहे. विश्व हिंदु परिषदेने सिद्दीकी आणि वजरूद्दीन यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर त्या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला. खरे पहाता हिंदु विद्यार्थ्यांकडून गणपति, श्रीराम, श्रीकृष्ण यांच्याविषयीच्या प्रार्थना म्हणवून घ्यायला हव्यात; पण तसे न होता अल्लाची प्रार्थना म्हणवून घेतली जाणे हा धर्मांतराचाच प्रकार होय. हिंदूबहुल देशात हिंदु धर्मियांच्या दृष्टीने नव्हे, तर इस्लाम धर्माची बळजोरी केली जाते, ही कुठली आली धर्मनिरपेक्षता ? एरव्ही मुसलमान किंवा ख्रिस्ती धर्मियांवर तथाकथित अन्यायाची ओरड झाल्यावर निधर्मीवादी, समतावादी, पुरो(अधो)गामी सगळे संघटित होऊन त्याला विरोध करतात; पण आता ‘मेरे अल्ला’च्या संदर्भात हिंदूंच्या बाजूने उभे रहायला कुणीही सिद्ध होत नाही. हिंदूबहुल भारतात हिंदु नेहमी एकटा पडतो, हेच खरे ! अर्थात् याला हिंदूही तितकेच उत्तरदायी आहेत; कारण ‘अल्लाची प्रार्थना घेतली जाते’, हे लक्षात आल्यावर याला किती पालकांनी विरोध केला ? याविषयीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर सत्य उघडकीस आले; पण हिंदु पालकांनी शाळा प्रशासनाला जाऊन वेळीच खडसावले का नाही ? धर्मशिक्षण नसल्याने कोणती प्रार्थना म्हणायची आणि कोणती नाही, हेही हिंदु विद्यार्थ्यांना समजत नाही. त्यामुळे धर्मापलीकडच्या गोष्टी केल्या जातात. असंख्य शारीरिक अत्याचार आणि वेदना होऊनही, तसेच मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असतांनाही छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मपरिवर्तन केले नाही. त्यांनी धर्मपालन करत स्वतःचे धर्मकर्तव्य पार पाडले. आजच्या विद्यार्थ्यांना मोगल सम्राट, तसेच चिनी राज्यकर्ते यांचा इतिहास शिकवला जात असल्याने जाज्वल्य असणारा भारतीय राजांचा इतिहास कसा ठाऊक होणार ? त्यांचा आदर्श मुलांसमोर निर्माण तरी कसा होणार ?
अन्य धर्मियांच्या लांगूलचालनाचा परिणाम !
उत्तरप्रदेशमधील घटना ही झाली नाण्याची एक बाजू ! दुसरी बाजू बघितल्यास ‘हिंदु धर्माची अवस्था कशी झाली आहे’, हे प्रकर्षाने लक्षात येईल. चित्तोडगड (राजस्थान) येथे धर्मांधांनी एका हिंदु तरुणाला दुचाकीवर लिहिलेला ‘बजरंग बली’ हा शब्द न हटवल्यास ठार मारण्याची धमकी दिली; पण पोलिसांनी या प्रकरणात काहीही केले नाही. उत्तरप्रदेश आणि राजस्थान दोन्ही ठिकाणच्या घटना परस्परविरोधी आहेत. हिंदु विद्यार्थ्यांनी अन्य धर्मियांच्या ‘हो’ ला ‘हो’ म्हणायचे; पण अन्य धर्मियांनी हिंदूंच्या देवतांच्या नावाला वारंवार विरोध करायचा, ठार मारण्याची धमकी द्यायची, हा कुठला न्याय ? हिंदूंच्याच भारतात धर्मांधांकडून दिल्या जाणार्या धमक्यांना हिंदू बळी पडतात. एखाद्याने स्वतःच्या दुचाकीवर काय लिहावे, याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. यात नाक खुपसण्याची मुसलमानांना काय आवश्यकता ? पण तसे होत नाही. मुसलमान त्यांचे धर्मकर्तव्य योग्यरित्या बजावतात. त्यांची वेळ झाली की, कुठेही नमाज पढतात. मग ते स्थळ-वेळ काहीही पहात नाहीत. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी वर्गात बसून नमाज पढतात. कोणतेही शिक्षक त्यांना विरोध करू शकत नाहीत. या सर्वांना कधी कोणत्या हिंदूने आक्षेप घेतल्याचे ऐकिवात आहे का ? कधीच नाही; कारण अन्य धर्मियांच्या विरोधात ‘ब्र’ काढण्याचेही हिंदूंमध्ये धाडस नाही. राजस्थानमधील हिंदूंनी ‘बजरंग बली हनुमान की जय’ म्हणून धर्मांधांना हिंदूंचे संघटन का दाखवले नाही ? केवळ दुचाकीवर देवतांची नावे लिहून काय उपयोग ? हिंदूंच्या देवतांचे सामर्थ्य आपल्या लक्षात कधी येणार ? हिंदूंनो, त्या बजरंग बलीची महानता समजून घेण्यासाठी तरी धर्मशिक्षण घ्या, अन्यथा धर्मविरोधी आक्रमणे अशीच झेलत रहावी लागतील. आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी अन्य धर्मियांच्या केलेल्या लांगूलचालनाचाच हा परिणाम आहे. भारत आहे खरा हिंदूबहुल; पण येथे वट चालते ती इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मियांची ! त्यामुळेच तर भारतात मंदिरांची संख्या दिवसेंदिवस अल्प होऊन मशिदी आणि प्रार्थनास्थळे (अर्थात् तीही अवैधच) यांची भर पडत आहे. भारतातील शाळांमध्ये कोणे एकेकाळी ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा’चे सूर कानी पडायचे, त्याच शाळांमधून आता बांग दिली जाऊ लागली, तरी कुणाला नवल वाटणार नाही.
भारतियांनो, शहाणे व्हा !
धर्मांध जसे ‘बजरंग बली’ शब्दाला विरोध करतात, तसाच त्यांचा विरोध ‘वन्दे मातरम्’ या शब्दालाही आहे. देशातील अनेक मुसलमानबहुल भागांमध्ये ‘वन्दे मातरम्’ उच्चारायलाही हिंदु धर्मीय घाबरतात. हिंदूंची वाजत-गाजत जाणारी एखादी मिरवणूक मशिदीच्या समोरून मात्र शांततेत न्यावी लागते. आजूबाजूचा परिसर मुसलमानबहुल असल्याने काही शाळांमध्ये ‘वन्दे मातरम्’च म्हटले जात नाही, तर त्याऐवजी माणुसकी जोपासणारी प्रार्थना शिकवली जाते. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना ‘वन्दे मातरम्’विषयी ठाऊकच नाही. राष्ट्रभक्तांच्या जगण्याचा मूलमंत्र असणार्या ‘वन्दे मातरम्’ची अशी स्थिती होणे, हे स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणार्या भारताच्या दृष्टीने खेदजनक आहे. भारतियांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. वेळीच शहाणे होऊन धर्माच्या मार्गावरून वाटचाल करावी. तसे झाल्यासच हिंदूंचे भवितव्य चांगले राहू शकते, अन्यथा हिंदूंची दैन्यावस्था होण्यास वेळ लागणार नाही. उत्तरप्रदेश आणि राजस्थान येथील प्रकरणांची पुनरावृत्ती टाळायला हवी. विविध प्रकारच्या जिहादची टांगती तलवार हिंदूंच्या डोक्यावर आहेच. धर्मच त्यातून आपल्याला तारू शकतो, हे लक्षात घेऊन धर्माचरण करायला हवे. धर्मशिक्षण घेतलेला प्रत्येक हिंदूच धर्मावरील आघातांचा सामना करू शकतो. यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षित होऊन धर्मरक्षणाचे कर्तव्य पार पाडणे, हेच कालसुसंगत ठरेल !
हिंदु विद्यार्थ्यांना अल्लाची प्रार्थना म्हणावी लागणे, ही भारताची इस्लामीस्तानच्या दिशेने होणारी वाटचाल ! |