मागासवर्गीय वसतीगृहातील मुलामुलींना ७ कोटी ५९ लाखांच्या निर्वाह भत्त्याचे वाटप ! – मंत्री संजय राठोड
विधानपरिषद लक्षवेधी…
नागपूर, २३ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय वसतीगृहातील मुला-मुलींना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात आला आहे. उर्वरित निर्वाह भत्ता वाटपासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून लवकरच विद्यार्थ्यांना तो देण्यात येईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी २३ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिली.
#विधानपरिषद_लक्षवेधी
राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय वसतिगृहातील मुलामुलींना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात आला. उर्वरित भत्ता वाटपासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून लवकरच तो विद्यार्थ्यांना देण्यात येईल- मंत्री @SanjayDRathods— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 23, 2022
सदस्या डॉ. मनीषा कायंदे यांनी शासकीय वसतीगृहातील समस्यांविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य महादेव जानकर, श्रीकांत भारतीय, आमश्या पाडवी, अभिजीत वंजारी आणि उमा खापरे यांनी सहभाग घेतला.