धर्मांधाशी संबंध असणार्या हिंदु महिलेच्या पतीच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद !
• मुरुड (जिल्हा रायगड) येथे लव्ह जिहाद • गुन्हा नोंद करण्यास पोलिसांची ६ मास टाळाटाळ• खुनाचे कलम पोलिसांनी लावलेच नाही !• दोन्ही आरोपी फरार असल्याची चर्चा • हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाची आणि सभा घेण्याची चेतावणी ! |
नागोठणे (जिल्हा रायगड) – येथील मंजर जुईकर या धर्मांधाने मुरुड येथील पायल जैन या विवाहित महिलेला त्याच्या प्रेमपाशात फसवून तिच्याकरवी तिचे पती चंदन जैन यांचा संपत्तीसाठी खून केल्याची तक्रार मुरुड येथील पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंजर या धर्मांधाची पहिली पत्नी ही हिंदूच असून ती सध्या त्याच्याकडेच असते. मंजर याची पार्श्वभूमीही गुंडगिरी आणि अरेरावी करणारी असल्याचे स्थानिकांकडून समजते.
१. जैन यांची बहीण पुष्पा गांधी यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीनुसार पायल जैन हिचे मंजर या धर्मांधाशी गेली अनेक वर्षे संबंध होते. या कारणावरून तिची पतीशी वारंवार भांडणे व्हायची आणि त्यांनी घटस्फोटही घेतला होता; तरी परत ती त्याच्याकडे रहायला आली होती. जैन यांना स्नायूंचा आजार होता. पायल हिने पती चंदन जैन यांना झोपेच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात भ्रमणभाषवरील संवाद, संपर्क, तसेच गुगलवर सर्च केलेले झोपेच्या गोळ्यांचे परिणाम, झोपेच्या गोळ्या, ‘पोस्टमार्टेम होणार नाही ना’, याविषयी झालेला संवाद आदी अनेक पुरावेही त्यांना मिळाल्याचेही गांधी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
२. एवढे असूनही पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यास पोलिसांनी तब्बल ६ मास टाळाटाळ केली. त्यानंतर पुष्पा गांधी यांनी राजकीय पक्षाचे साहाय्य घेतले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला; परंतु ३०२ हे खुनाचे कलम नोंद न करता ३०४ आणि ३४ या सौम्य कलमांखाली गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद झाल्यावर पोलिसांनी तात्काळ अटक न केल्याने मंजर आणि पायल हे दोघेही फरार झाल्याचे समजते. त्यामुळे ‘पोलिसांनी त्यांना पळून जाऊ दिले’, अशीही गावात चर्चा आहे. येथील पोलीस आणि धर्मांध यांच्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचेही गावातील अनेकांनी सांगितले.
३. यापूर्वी पायल जैन ही नागोठणे येथे मंजर याच्या घरी रहायला आल्यावर येथील जैन समाजातील लोकांनी तिला समजावून परत घरी पाठवले होते; परंतु त्याचा उपयोग झाला नाही. ‘आतापर्यंत ३ वेळा ती घरून पळून गेली होती आणि तिन्ही वेळा तिने घरून जातांना दागिने आणि रोख रक्कम नेली होती’, असे तक्रारीत म्हटले आहे.
४. मंजर याची पहिली हिंदु पत्नी ही राज्यस्तरीय खेळाडू होती. काही वर्षांपूर्वी ती घरच्यांच्या विरोधाला न जुमानता मंजरसमवेत पळून गेल्यावर हिंदुत्वनिष्ठ तिला त्याच्या कह्यातून सोडवण्यासाठी गेल्यावर तिच्या अंगावर अनेक ठिकाणी गंडे-दोरे बांधलेले आढळले होते; मात्र त्यानंतरही तिने त्याच्याकडे जाण्याचा हट्ट चालू ठेवल्याने हिंदुत्वनिष्ठ तिला सोडवू शकले नाहीत. सध्या ती बुरखाही परिधान करते.
या सर्व पार्श्वभूमीवर नागोठणे, मुरुड, तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्माभिमानी, वारकरी संप्रदाय, अन्य आध्यात्मिक आणि धार्मिक संघटना, तसेच जैन समुदाय हे या प्रकरणी मोठे आंदोलन उभारण्याच्या सिद्धतेत असून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी मोठा मोर्चा काढण्याची सिद्धता करत आहेत. तसेच ‘या प्रकरणी मोठ्या धर्मसभेचे आयोजन करू’, असेही महाराष्ट्रातील जैन समाजाने सांगितले आहे. |
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद करणारे धर्मांध आणि त्यांच्यावर कारवाई न करणारे पोलीस या दोघांनाही तेवढीच कडक शिक्षा व्हायला हवी ! |