कुख्यात खुनी चार्ल्स शोभराज याची १९ वर्षांनंतर कारागृहातून सुटका !
काठमांडू (नेपाळ) – कुख्यात खुनी चार्ल्स शोभराज (वय ७८ वर्षे) याची १९ वर्षांनंतर कारागृहातून सुटका करण्यात आली. चार्ल्स शोभराज याच्या वयाचा विचार करून नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला सोडण्याचा आदेश दिला होता. चार्ल्स शोभराज लवकरच त्याच्या मायदेशी फ्रान्सला परतणार आहे. त्याला वर्ष २००३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
१. चार्ल्स शोभराज पर्यटकांशी मैत्री करायचा. त्यानंतर त्यांना अमली पदार्थ द्यायाचा. एकदा पर्यटकावर नशेचा अंमल चढला की, त्यांना लुटून त्यांची हत्या करायचा. शोभराजवर १९७० च्या दशकात अशा प्रकारे १५ ते २० हत्या केल्याचा आरोप होता.
२. चार्ल्स शोभराजची आई व्हिएतनामची आहे, तर वडील भारतीय आहेत. शोभराजचा जन्म ६ एप्रिल १९४४ ला व्हिएतनामच्या सायगॉनमध्ये झाला. त्या वेळी व्हिएतनामवर फ्रान्सचे नियंत्रण होते. त्यामुळे शोभराजकडे फ्रान्सची नागरिकता आहे.
Nicknamed ‘the Bikini Killer’ and ‘the Serpent’ due to his skill at deception and evasion, #CharlesSobharaj was serving a life-term in the Kathmandu jail since 2003 for the murder of American woman in #Nepalhttps://t.co/YPaxsB7yGQ
— News18.com (@news18dotcom) December 23, 2022
चार्ल्स शोभराजला ‘बिकिनी किलर’ का म्हटले जाते ?
चार्ल्स शोभराजने ज्या हत्या केल्या, त्यात काही महिलांचाही समावेश आहे. त्या महिला बिकिनीत (अंतर्वस्त्रात) असतांनाचे मृतदेह मिळाले आहेत. त्यामुळेच चार्ल्स शोभराज ‘बिकिनी किलर’ म्हणूनही कुख्यात आहे.