पांजरपोळ (पुणे) येथे चालू असलेल्या ‘कामधेनू महोत्सव अर्थात् विश्व गो परिषद २०२२’च्या निमित्ताने…
देशी गायीचे महत्त्व आणि तिची उपयुक्तता
२४ जून १८१३ म्हणजे २०९ वर्षांपूर्वी ब्रिटीश ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘देशी गाय’ नष्ट करून भारतियांना गरीब कसे करायचे ?’, यावर चर्चा होऊन विधेयक संमत झाले. ब्रिटीश तज्ञांनी भारताचा ६ मास अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले,
अ. भारत ९५ टक्के शेतीप्रधान देश आहे; कारण येथील शेती अतिशय समृद्ध आहे.
आ. धनधान्य उत्तम आणि मुबलक आहे. घरोघरी सोने नाणे पुष्कळ आहे.
इ. या शेतीचा मूळ आधार आहे गाय ! ती नष्ट झाली, तर शेतीव्यवस्था नष्ट होईल आणि गरीब झालेले लोक ख्रिस्ती होतील.
१. भारतीय गाय नष्ट करणे, हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र !
यासाठी वर्ष १८२० मध्ये गायींच्या कत्तलीसाठी पहिला कत्तलखाना कोलकाताला चालू झाला आणि त्यानंतर गोवंशाची बेसुमार कत्तल झाली. देश स्वतंत्र झाल्यावरही कत्तली चालूच राहिल्या. गोमांसाचे (बीफ) महत्त्व परदेशात वाढत गेले. यामुळे गेल्या २०० वर्षांनंतर केवळ १ टक्का देशी गाय भारतात शिल्लक आहे. हे एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र होते आणि त्याला आमच्याच शासनकर्त्यांनी नंतर मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे.
२. विदेशी गायीच्या दुधामुळे कर्करोगासारखे रोग होणे
गोधन नष्ट करतांना देशात दूध न्यून पडू नये; म्हणून गेल्या ७५ वर्षांत जर्सी, होस्टन यांसारख्या गायींची पैदास वाढवली. यामुळे कर्करोगासारखे (‘कॅन्सर’सारखे) रोग पसरले. शिरोळ तालुक्यात (जिल्हा कोल्हापूर) कर्करोगाने थैमान घातले, ते केवळ संकरित गायीच्या विषारी दुधामुळे आहे, हे आता सिद्ध झाले आहे.
३. देशी आणि संकरित गाय यांच्या दुधाविषयीचा विविध स्तरांवरील भेद
अ. संकरित गायीचे दूध विष, तर देशी गायीचे दूध आईच्या दुधाप्रमाणे अमृत आहे.
आ. संकरित गायीच्या दुधामुळे शरिरातील इंद्रियांच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो, तर देशी गायीच्या दुधामुळे प्रतिकारक्षमता वाढते आणि सर्व इंद्रिये कार्यक्षम होतात.
इ. ‘संकरित गाय पुष्कळ दूध देणारी म्हणून चौपट महाग आणि देशी गाय अल्प दूध देते’; म्हणून स्वस्त आहे; पण संकरित गायीच्या दुधामुळे शरीर जर्जर आणि रोगग्रस्त होते (मधुमेहाचे प्रमाण वाढण्याचे एकमेव कारण हे दूध आहे), तर देशी गायीच्या दुधामुळे प्रतिकारक्षमता वाढल्याने शरीर मजबूत अन् व्याधीमुक्त होते.
ई. आज अनेक गर्भश्रीमंत कारखानदार, नटनट्या, उद्योगपती स्वतःच्या शरीर स्वास्थ्यासाठी १ सहस्र रुपये प्रति लिटर भावाने देशी गायीचे दूध, ८ ते १० सहस्र रुपये किलो दराने तूप घेऊन खात आहेत. त्यांच्यासाठी देशी गायीचे विशेष गोठे सिद्ध केले आहेत.
४. शासनकर्त्यांनी देशी गायींची पैदास वाढण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ॲलोपॅथी औषधांच्या बाजारपेठांची व्यवस्था करणे
भारतीय गीर (काठीयवाडी) गाय ब्राझिलमध्ये नेली, येथील वळूंना विदेशींनी नेले आणि संशोधन करून ६४ लिटर दूध देणारी गाय सिद्ध केली. गीर, लाल सिंधी, साहिवाल, कांकरेज या पुष्कळ दूध देणार्या गायींची पैदास शासनकर्त्यांनी वाढवली नाही; उलट संकरित गायीचे विषारी दूध पाजून परदेशी ॲलोपॅथी औषधांसाठी बाजारपेठ सज्ज करण्यासाठी या देशातील लोकांचे शरीर व्याधीग्रस्त कसे होईल ? याची व्यवस्था केली.
मूळ भारतातून नामशेष झालेली ‘ब्राह्मण’ ही देशी गायीची जात केवळ अमेरिकेत आहे. या गायींसाठी कोट्यवधी रुपयांचे मूल्य मोजून ऑस्ट्रेलिया, मलेशिया आदी देश त्या विकत घेत आहेत. परदेशातील शास्त्रज्ञांनी प्रत्येक प्रकारची गाय आणि वळू यांना भारतातून नेले. संशोधन करून गायीची पैदास केली, उत्तम प्रकारचे दूध मिळवले आणि आमच्या शासनकर्त्यांनी जर्सी, हॉस्टन यांसारख्या विषारी दुधाच्या गायींची पैदास करण्याचं कारस्थान करून आपल्याच जनतेला व्याधीग्रस्त केले आहे.
५. गायीच्या वशिंडात सूर्यकिरणांतील उपयोगी किरणे शोषली जात असल्याने तिच्या जनुकांमधून प्रतिकारक्षमता वाढून पौष्टिक दूध मिळणे
जगात कोणत्याही गायीला वशिंड (गायीच्या पाठीवरील उंचवट्याचा भाग) नाही, केवळ भारतीय गायींना वशिंड आहे. या वशिंडात सूर्यकिरणांतील काही उपयुक्त किरण शोषून घेण्याची क्षमता आहे. या उपयुक्त किरणांमुळे गायीच्या ‘जीन्स’मध्ये (जनुकांमध्ये) शारीरिक प्रतिकारक्षमता सिद्ध होते. ती क्षमता दुधात उतरते आणि असे पौष्टिक दूध मानवाला मिळते. देशी गायीचे दूध आईच्या दुधाच्या इतकेच शरिराचे उत्तम पोषण करणारे आहे. याखेरीज मानवी शरीर तंदुरुस्त आणि व्याधीमुक्त रहाते. यामुळे पूर्वीच्या माणसांचे आयुष्यमान उत्तम होते.
६. गोमय आणि गोमूत्र यांचे होणारे विविध लाभ
दूध हा गायीचा उपपदार्थ आहे. गाय दूध केवळ व्याल्यावर काही काळ देते, सतत देत नाही. गायीपासून कायम मिळणारा मुख्य पदार्थ म्हणजे शेण (गोमय) आणि मूत्र (गोमूत्र). शेण आणि गोमूत्र यांपासून आपण ‘सुभाष पाळेकर कृषी’मध्ये जीवामृत (देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्यापासून बनवलेले नैसर्गिक खत), घनजीवामृत बनवू शकतो. गायीचे शेण आणि मूत्र यांत जीवाणू निर्माण करण्याची प्रचंड क्षमता असते. हे जीवाणू वनस्पतींना वाढीसाठी लागणारी सर्वच अन्नद्रव्ये भूमीमधून उपलब्ध करून देतात.
गोमूत्र हे आयुर्वेदाच्या औषधांसाठी उपयुक्त आहे. आयुर्वेदिक गुटी-वटी गोळ्यांना केवळ गोमूत्राची भावना दिल्याने (गोळ्यांना वरून लावल्याने) गोळ्यांची क्षमता अनेक पटींनी वाढते. कॅन्सरसारख्या अनेक दुर्धर व्याधींमध्ये गोमूत्राचा चांगला उपयोग होत असल्याचे; सिद्ध झाले आहे. गोमूत्र शिंपडल्याने घातक जंतू, विषाणू नष्ट होतात, तसेच घातक किरणोत्सर्गापासून रक्षण होते, याची अनुभूती अणुशक्ती केंद्र दुर्घटनेत काहींनी घेतली आहे.
७. हिंदूंनी गायीला विश्वाची माता मानणे
‘धेनुः त्वं कामधेनुः सर्वपापविनाशिनी ।
मोक्षफलदायिनी च मातृदेवि नमोऽस्तुते ।।’
अर्थ : गोमाते, तू कामधेनु (इच्छित फळ देणारी) आहेस. तू सर्व पापांचा नाश करून मोक्षफळ देणारी आहेस. अशी मातृदेवी, तुला माझा नमस्कार असो.
तरी वेद आणि पुराणकाळापासून हिंदू गायीला विश्वाची माता ‘गावो विश्वस्य मातरः ।’ म्हणजे ‘गायी या विश्वाच्या माता आहेत’, असे म्हणतात.