माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांची ५५ कोटी रुपयांची बेहिशोबी भूमी जप्त !
कोईंबतूर (तमिळनाडू) – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुकचे नेते ए. राजा यांची ५५ कोटी रुपयांची ४५ एकर भूमी जप्त केली आहे. ही बेहिशोबी संपत्ती असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने ए. राजा यांना १० जानेवारी २०२३ या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे. वर्ष २०१५ मध्ये ए. राजा यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
DMK सांसद ए राजा की 55 करोड़ की संपत्ति कुर्क…
Watch : https://t.co/qGwDvA6A6k#DMK #ARaja #Bharat24Digital @journomskanwar @iamsachindubey @ShamsherSLive pic.twitter.com/fovnCl7fwC
— Bharat 24 – Vision Of New India (@Bharat24Liv) December 23, 2022
संपादकीय भूमिकाअशा भ्रष्टाचार्यांची सर्वच संपत्ती जप्त करून अशांना आजन्म कारागृहात डांबल्यावरच देशातील भ्रष्टाचाराला आळा बसेल ! |