आदिवासी समाजाच्या जागांची भरती डिसेंबर २०२३ पर्यंत करू ! – दीपक केसरकर
नागपूर, २३ डिसेंबर (वार्ता.) – शासनाच्या करण्यात येणार्या ७५ सहस्र पदांच्या भरतीमध्ये आदिवासी समाजासाठी ७ टक्के जागा आरक्षित आहेत. यांतील श्रेणी ‘क’ आणि ‘ड’ च्या जागा मार्च २०२३ पर्यंत, तर ‘अ’ अन् ‘ब’ श्रेणीच्या जागा महाराष्ट्र सेवा आयोगाद्वारे डिसेंबर २०२३ पर्यंत भरण्यात येतील, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी २३ डिसेंबर या दिवशी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. वर्ष २०१९ मध्ये भरतीचा निर्णय घेण्यात आला; मात्र ही भरती झाली नव्हती. आताचे सरकार भरतीप्रक्रिया कालबद्धतेत पूर्ण करेल, असे आश्वासन या वेळी दीपक केसरकर यांनी दिले.