‘सम्मेद शिखर’ या जैन तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ बनवण्याच्या विरोधात राजस्थानमध्ये जैन समाज रस्त्यावर !
जयपूर (झारखंड) – झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखर याला पर्यटन स्थळ बनवण्यात येणार आहे. याच्या विरोधात राजस्थानमध्ये जैन समाजाकडून गेल्या ३ दिवसांपासून प्रखर विरोध केला जात आहे. विविध शहरांमध्ये मोर्चे काढून आणि बंद पाळून याला विरोध केला जात आहे. राज्यातील शहरांमध्ये जैन धर्मियांकडून मोर्चे काढण्यात आले आहेत. २५ डिसेंबर या दिवशी राज्यांतील अनेक शहरांत मूक मोर्चेही काढण्यात येणार आहेत.
२ ऑगस्ट २०१९ या दिवशी तत्कालीन झारखंड सरकारने केंद्रीय वन मंत्रालयाकडे सम्मेद शिखर याला पर्यावरण पर्यटनासाठी अनुमती मागितली होती. या संदर्भात जैन धर्मियांकडून हरकती आणि सूचना न मागवता त्याला मान्यता देण्यात आली होती.
(सौजन्य : Udaipur News)
पर्यटन स्थळाच्या सूचीतून सम्मेद शिखरचे नाव हटवले !
सम्मेद शिखर याला पर्यटन स्थळाच्या सूचीतून काढण्यात आले आहे, अशी माहिती आचार्य भगवान श्री विद्यासागरजी महाराज यांनी एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दिली आहे.
(सौजन्य : Jinvani Channel)
त्यांनी याचे श्रेय विश्व जैन संघटनेला दिले आहे; मात्र याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही.