कल्याण येथे रिक्शाचालकाकडे पैसे मागणार्या वाहतूक शाखेच्या अधिकार्याचे स्थानांतर !
नागरिकांकडून कारवाईची मागणी
ठाणे, २२ डिसेंबर (वार्ता.) – कल्याण येथील कोळसेवाडी वाहतूक शाखेचा अधिकारी निवृत्ती मेळावणे याने एका रिक्शाचालकाकडे ५०० रुपये मागून २०० रुपये घेतल्याचे चित्रीकरण सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहे. या घटनेनंतर संबंधित पोलिसाचे वाहतूक नियंत्रण विभागात स्थानांतर करण्यात आले आहे; मात्र याविषयी नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून ‘केवळ स्थानांतर न करता त्याला कठोर शिक्षा करावी’, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच लाचखोरांना लाच मागण्याचे भय उरलेले नाही. – संपादक)