अधिवेशनातील अनेकांना सर्दी, खोकला आणि ताप !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना मुखपट्टीची (मास्कची) सक्ती करणार !
नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) – नागपूर येथे हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्यांमध्ये सर्दी, खोकला आणि ताप ही लक्षणे असलेले रुग्ण वाढत आहेत. विधानभवन परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत ६०० हून अधिक रुग्ण आले असून त्यांपैकी निम्म्या रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला, ही लक्षणे आढळून आली आहेत.
जगातील काही देशात करोनाचे रुग्ण वाढत असतांनाच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप यापैकी एक वा अधिक लक्षणाचे रुग्ण वाढत आहे. https://t.co/Lj7LHqjroW
— LoksattaLive (@LoksattaLive) December 22, 2022
यांत काही पोलीस आणि आमदार यांचाही समावेश आहे. ‘वातावरणात पालट झाल्याने रुग्णांना असे त्रास होत आहेत. ही लक्षणे कोरोनाची नाहीत’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले.