एकमेकांच्या साहाय्याने लागवड करा !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘परसबाग किंवा छतावरील लागवडीचा आवाका मर्यादित असतो. त्यामुळे जीवामृत, घनजीवामृत, बियाणे इत्यादींची अल्प प्रमाणात आवश्यकता असते. एकाच परिसरात किंवा एकाच गावात रहाणार्या ४ – ५ जणांनी मिळून या सर्व गोष्टी आपसांत वाटून घेतल्या, तर प्रत्येकाचा वेळ आणि पैसे या दोघांची बचत होऊ शकते. एकमेकांच्या साहाय्याने लागवड केल्यास इतरांकडून शिकता येते आणि सर्वांचा उत्साहसुद्धा टिकून रहातो.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१४.१२.२०२२)