बरेली (उत्तरप्रदेश) येथील सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांकडून करवून घेतली जात होती ‘मेरे अल्ला’ प्रार्थना !
|
बरेली (उत्तरप्रदेश) – बरेली जिल्ह्यातील फरीदपूरमधील मुहल्ला परा भागात असणार्या कमला नेहरू पूर्व माध्यमिक विद्यालय या सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांकडून ‘मेरे अल्ला’ ही मदरशांतील प्रार्थना करवून घेण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. याविषयी शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आली. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक नाहिद सिद्दीकी यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शिक्षणमित्र वजरूद्दीन यांची चौकशी करण्यात येणार आहे. विश्व हिंदु परिषदेने या सिद्दीकी आणि वजरूद्दीन यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणे आणि वातावरण बिघडवणे यांप्रकरणी तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विश्व हिंदु परिषदेने यामागे धर्मांतराचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे.
बरेली के एक सरकारी स्कूल में मदरसे वाली प्रार्थना कराई गई। विश्व हिंदू परिषद ने इसको लेकर प्रधानाचार्य और शिक्षामित्र के खिलाफ केस दर्ज करवाया है। @NavbharatTimes pic.twitter.com/5DqeYBPbMZ
— NBT Uttar Pradesh (@UPNBT) December 22, 2022
विहिंपचे नगर अध्यक्ष सोमपाल राठोर म्हणाले की, सिद्दीकी आणि वजरूद्दीन अनेक दिवसांपासून मुलांकडून प्रार्थना म्हणवून घेत आहेत. याला विरोध करणार्या मुलांना धमकी दिली जात होती. (जर हे अनेक दिवस चालू होते, तर शिक्षण विभाग झोपले होते का ? उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)
संपादकीय भूमिकामदरसे किंवा चर्च येथे ‘हे श्रीकृष्णा’ अशा प्रकारची प्रार्थना कधीतरी करवून घेतली जाईल का ? |