महाराष्ट्रात मद्याच्या अवैध विक्रीप्रकरणी एका वर्षात ३५ सहस्र ५९ जणांना अटक !
१४४.४२ कोटी रुपयांचा मुद्देमाल कह्यात
नागपूर – महाराष्ट्रात मद्याची अवैध विक्री रोखण्यासाठी विविध उपययोजना करण्यात येत असून २०२१-२२ या एका वर्षात मद्याची अवैध विक्री केल्याच्या प्रकरणी ४७ सहस्र ७४९ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यापैकी ३५ सहस्र ५९ जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात एकूण १४४.४२ कोटी (१ अब्ज ४४ कोटी ४ लाख २० सहस्र रुपये) रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील मद्याच्या होणार्या अवैध विक्रीच्या विषयी विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे.
संपादकीय भूमिकाअशांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |