नागपूर येथील हिंदु जनसंघर्ष मोर्च्यातील मान्यवरांचे विचार !
तन, मन, धन आणि राजकीय बळ वापरून हे कायदे झाले पाहिजेत ! – जैनमुनी पू. नीलेशचंद्र महाराज, संस्थापक, विश्व महावीर ट्रस्ट
हे सरकार हिंदुत्वाच्या सूत्रावर स्थापन झाले आहे. ७० वर्षांच्या गुलामीनंतर हिंदुत्वाचे शासन मिळाले आहे. हिंदुत्वाचे शासन असूनही जर हिंदूंच्या सुनामुलींचे रक्षण होत नसेल, तर असे सरकार आम्हाला नको. छत्रपती शिवरायांची तलवार जेव्हा म्यानातून बाहेर पडते, तेव्हा सुनामुलींचे रक्षण होते. तन, मन, धन आणि राजकीय बळ वापरून लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदे झाले पाहिजेत.
‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याची हीच वेळ ! – आमदार भरतशेठ गोगावले
महाराष्ट्रात झालेल्या हिंदु युवतींच्या हत्या या अंगावर शहारा आणणार्या आहेत. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ कायदा होण्यासाठी समस्त हिंदु समाजासह साधुसंतही पेटून उठले आहे. हा कायदा करण्याची हीच ती वेळ आहे. आम्हाला कोणत्या धर्माविषयी द्वेष नाही; परंतु आमच्या धर्माला कुणी डिवचण्याचा प्रयत्न करू नये. काही राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदा झाला आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही कायदा व्हायला हवा, ही सर्व संत आणि समस्त हिंदु समाज यांची मागणी आहे. यासाठी आम्ही विधीमंडळामध्ये पाठपुरावा करू.
लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू ! – आमदार मंगेश चव्हाण, भाजप
लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे व्हावेत, ही हिंदूंची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार आहे. या अधिवेशनात हे कायदे यावेत, यासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करू. हिंदूंचे शोषण रोखण्यासाठी हे कायदे होणे, ही काळाची आवश्यकता आहे.
लव्ह जिहादविरोधी कायदा होत नाही, तोपर्यंत आम्ही लढा थांबवणार नाही ! – डॉ. परिणय फुके, माजी मंत्री, भाजप
या अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी कायदा व्हावा, अशी आमची मागणी आहे. यातून कुणालाही लक्ष्य करण्याचा हेतू नाही. हिंदु धर्माचे रक्षण होण्यासाठी हा कायदा आहे. या अधिवेशनात हा कायदा झाला पाहिजे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा लढा आम्ही थांबवणार नाही.
हिंदु युवतींच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ कायदा झाला पाहिजे !- चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
हा हिंदूंचा जनआक्रोश आहे. उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये हे कायदे झाले आहेत; परंतु महाराष्ट्रात श्रद्धा वालकर हिचे ३५ तुकडे करण्यात आले, तरी अद्याप महाराष्ट्रात हा कायदा झालेला नाही. हिंदु युवतींच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातही हा कायदा झाला पाहिजे.
हिंदूंच्या सहिष्णुतेचा अंत कुणीही पाहू नये ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती
श्रद्धा वालकर प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत आफताबला फासावर लटकवण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्रातील ३० सहस्र मुली आणि महिला गायब आहेत. लव्ह जिहादमध्ये फसवण्यात आलेल्या १० सहस्र हिंदु युवतींना पाकिस्तानात आतंकवादी प्रशिक्षण देण्यासाठी पाठवण्यात आले आहे. लव्ह जिहादला पैसा कोण पुरवते ? याचे अन्वेषण झाले पाहिजे. एका षड्यंत्राप्रमाणे लव्ह जिहाद चालू आहे. यामध्ये हिंदु युवतींची हत्या करणे, त्यांच्या अवयवांची विक्री करणे, वेश्या व्यवसायाला लावणे असे प्रकार चालू आहेत. यासह प्रतिवर्षी १८ लाख २५ सहस्र हिंदूंचे धर्मांतरही होत आहे. हे रोखण्यासाठी लव्ह जिहाद आणि धर्मांतरबंदी विरोधी कायदे झालेच पाहिजेत. हिंदू सहिष्णु आहेत; म्हणून त्यांचा अंत कुणीही पाहू नये.