देशात पुन्हा मुखपट्टी (मास्क) वापरणे बंधनकारक होण्याची शक्यता ! – केंद्रशासन
कोरोना अद्याप संपलेला नाही ! – केंद्रीय आरोग्यमंत्री
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी कोरोनाच्या संदर्भात बोलावलेल्या वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञ यांच्या बैठकीनंतर सांगितले की, कोरोना अजून संपलेला नाही; पण भारत प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सिद्ध आहे. आम्ही सर्व संबंधितांना सतर्क रहाण्यास आणि दक्षता वाढवण्यास सांगितले आहे.
नीती आयोगाचे डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले की, गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मुखपट्टी वापरावी. गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी आणि वृद्धांसाठी हे फार महत्त्वाचे आहे. सध्या केवळ २७ टक्के लोकसंख्येने लसीची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेतली आहे. हा डोस घेणे सर्वांसाठी अनिवार्य आहे.
स्वास्थ्य मंत्रालय की समीक्षा बैठक खत्म, मांडविया बोले- कोरोना अभी गया नहीं है@mansukhmandviya @MoHFW_INDIA #CoronavirusInIndia #CoronaVirus #COVID19 https://t.co/h6kk4FlCgQ
— Dainik Jagran (@JagranNews) December 21, 2022
भारतात ‘ओमिक्रॉन बीएफ्.७’ चे ३ रुग्ण
भारतात कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन बीएफ्.७’ विषाणूचे ३ रुग्ण आढळले आहेत. यात गुजरातमध्ये २, तर ओडिशामध्ये १ रुग्ण सापडला आहे.