भगवंताच्या कृपेने आणि त्याच्या बळावरच भारतात हिंदु राष्ट्र येईल !
रामनाथी, गोवा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. आज बंगालमधील मासिक ‘ट्रूथ’चे संपादक आणि शास्त्र-धर्म प्रचार सभेचे उपसचिव पू. डॉ. शिवनारायण सेन यांचे मार्गदर्शन येथे देत आहोत.
१. स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी उच्चशिक्षित तरुणांना ख्रिस्ती होण्यापासून थांबवणे
साम्यवादी श्री दुर्गापूजेवर विश्वास करत नव्हते. त्यामुळे लोकांचा मूर्तीपूजेवरील विश्वास उडाला. उच्चशिक्षित तरुणांना अन्य पंथियांचे आकर्षण वाटू लागले. कोणी म्हटले, ‘ख्रिस्ती नाही, ‘ब्राह्मो’ बनूया.’ स्वामी विवेकानंद, शारदानंद, ब्रह्मानंद सर्वच्या सर्व मोठे तेजस्वी होते. सर्वजण ‘ब्राह्मो’ बनले. त्यांना रामकृष्णांनी बोलावले, तर ते युवक त्यांच्या चरणी समर्पित झाले. त्यांनी विवेकानंदांना म्हटले, ‘अरे, तू जिला मूर्ती म्हणतोस, ती तर सजीव माता आहे.’ त्याने कापूस आणला आणि मातेच्या नाकासमोर धरला, तर तो कापूस श्वासासमवेत हलत होता. त्या श्वासासह तिचे मस्तकही हलत होते. ते पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी डोळे चोळून स्वच्छ केले. विवेकानंदांना प्रत्यय झाला. एकानंतर दुसर्या घटनांनी त्यांना दाखवले की, ‘मूर्तीपूजेतील ही केवळ निर्जिव मूर्ती नाही. तुला जी मातीची दिसते, ती खरेतर चिन्मयी आहे. तीच खरी चेतना आहे.’ अशा प्रकारे त्यांनी ख्रिस्ती होण्यापासून बंगालच्या युवकांना थांबवले.
२. मुसलमानांनी १० सहस्र हिंदूंचा संहार करूनही कागदोपत्री केवळ १० हिंदू ठार झाल्याचे दाखवणारे साम्यवाद्यांचे सरकार !
त्यानंतर वर्ष १९७७ मध्ये कम्युनिस्ट (साम्यवादी) लोक आले. त्यांनी पहिलेच मोठे कार्य केले, ते म्हणजे वर्ष १९७७ मध्ये त्यांनी संस्कृत शिकवायचे बंद केले. बांगलादेशमधून आलेल्या लोकांना मध्यप्रदेशमध्ये पुनर्वसन करून ठेवले जात होते. तेव्हा यांनी म्हटले, ‘‘आमच्या सुंदरबनमध्ये रहायला या.’’ दीड लाख बंगाली लोकांना पूर्व बंगालहून आणून येथे वसवले. साम्यवाद्यांना ही मते मिळणार नव्हती. त्यामुळे पोलिसांनी गोळ्या चालवल्या. सरकारी अहवालानुसार १० लोक ठार झाल्याचे सांगण्यात आले. माहिती काढल्यानंतर आता १० सहस्र लोकांना ठार करण्यात आल्याचे समजले. त्यांनी एक संपूर्ण बेट संपवले. अनिता दिवाण नावाची एक मुलगी होती. ती आरोग्य विभागाच्या लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासंदर्भात मुसलमानांमध्ये काम करत होती. तिला ठार मारण्यात आले. अशा प्रकारे त्यांच्या कारवाया चालू राहिल्या. सर्व विद्यापिठात त्यांचे सर्व काळे धंदे चालत होते. त्या वेळच्या आमच्या पंतप्रधान काहीच बोलल्या नाहीत, गुपचूप बघत राहिल्या.
३. भगवंताच्या कृपेने आम्ही अधर्माच्या विरोधात लढू शकलो !
आमच्यावर कितीतरी कठोर आघात झाले; परंतु संत प्रेमानंद सरस्वती, ठाकूर सीताराम, बंगालधील सर्व संत, धर्मसम्राट करपात्री महाराज, आता निरंजन देवकी, सिंधू महाराज, कांची कामकोटी पिठाचे तत्कालीन पीठाधिश्वर स्वामी जयेंद्र सरस्वती आदी अनेक संत आमच्या समवेत कार्य करत आहेत. पापाविरुद्ध, व्यभिचाराच्या विरुद्ध लढायचे आहे, हे लक्षात ठेवून धर्मासाठी कार्य करावे लागते. आम्हाला जाणीव आहे, आमचे परममित्र आमचे श्री भगवान आहेत. त्यांच्या कृपेनेच सर्व संभव होत आहे. त्याच्या बळावरच भारतात हिंदु राष्ट्र येईल. हे हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी त्याची शक्ती कार्य करील. यासाठी संतांच्या चरणी नमन आणि भगवान शिवाला प्रार्थना करत आहोत !
जयन्ति शास्त्राणि द्रवन्ति दाम्भिकाः ।
हृष्यन्ति सन्तो निपतन्ति नास्तिकाः ।।
अर्थ : जेव्हा शास्त्रांचा विजय होतो आणि ढोंगी पळ काढतात, तेव्हा सज्जनांना आनंद होतो अन् नास्तिकांचा पराभव होतो.’
– (पू.) डॉ. शिवनारायण सेन, संपादक, मासिक ‘ट्रूथ’, शास्त्र-धर्म प्रचार सभा, कोलकाता, बंगाल