साधकांनो, ‘आध्यात्मिक उन्नती कधी होईल ?’, याची काळजी न करता परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून तळमळीने प्रयत्न करत रहा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा !
‘प.पू. डॉक्टरांनी ‘एका साधिकेची आध्यात्मिक उन्नती २० वर्षांनी होईल’, असे सांगितले होते. त्यानंतर उत्तरदायी साधकांनी त्या साधिकेला साहाय्य करण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरीही तिच्यात साधनेच्या संदर्भात कसलीच जाणीव निर्माण होत नव्हती.
प.पू. डॉक्टरांनी तिच्याविषयी काढलेल्या उद्गारानंतर जवळजवळ १६ वर्षांनी तिच्यात साधनेविषयी अंतर्मुखता येऊ लागली असून तिची आध्यात्मिक उन्नती होत आहे.
यातून ‘परात्पर गुरुदेवांचे २० वर्षांपूर्वीचे बोल कशा प्रकारे सत्यात उतरत आहेत’, हे लक्षात येते आणि त्यांच्या द्रष्टेपणाची प्रचीती येते.
साधकांनो, ‘आध्यात्मिक उन्नती कधी होईल?’, याची काळजी न करता परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून तळमळीने प्रयत्न करत रहा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१२.२०२२)