लाच स्वीकारणार्‍या ग्रामसेवकाला पकडले !

धाराशिव – गायरान भूमीवर नावनोंदणी करण्यासाठी ४ सहस्र रुपयांची लाच घेतांना धाराशिव तालुक्यातील कुमाळवाडी येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत विभागाने १९ डिसेंबर या दिवशी रंगेहात पकडले. कुमाळवाडीतील एक व्यक्ती गायरान भूमीवर घर बांधून वास्तव्यास आहे. तिने ग्रामपंचायतीकडे भूमी नावावर करण्यासाठी ‘घरकुल’ योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज दिला होता; मात्र अर्जावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे नागरिकाने ग्रामसेवक सुयज्ञ मैंदाड यांना संपर्क केला असता त्यांनी या कामासाठी १० सहस्र रुपयांची लाच मागितली. नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ग्रामसेवकाची तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी ग्रामसेवक मैंदाड यांना ४ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पकडले.

संपादकीय भूमिका

तळागाळापर्यंत पोचलेल्या भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर शिक्षापद्धतीच अवलंबायला हवी !