विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गाशक्ती मुंबई क्षेत्र प्रांताचा निवासी अभ्यास आणि प्रशिक्षणवर्ग जोतिबा डोंगर परिसरात पार पडला !

विहिंपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलतांना सरपंच सौ. राधा बुणे, तसेच मान्यवर

श्री क्षेत्र जोतिबा (जिल्हा कोल्हापूर) – विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गाशक्ती मुंबई क्षेत्र प्रांताचा निवासी अभ्यास आणि प्रशिक्षणवर्ग १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत जोतिबा डोंगर परिसरात पार पडला. ‘अवघ्या समाजाला सकारात्मक दिशा निश्चितपणे नारी शक्ती देईल’, असा विश्वास विश्व हिंदु परिषदेचे ज्येष्ठ संघटक श्री. शंकर गायकर यांनी या वेळी व्यक्त केला. १८ जिल्ह्यांतील मुंबई-दुर्गा विभागाच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकारी यात सहभागी झाल्या होत्या.

वर्गाच्या प्रमुख ‘मातृशक्ती’ संघटिका किशोरीताई केळकर यांनी ३ दिवस चाललेल्या या वर्गातील विविध सत्रांचा आढावा घेतला. विहिंप कोल्हापूर जिल्हा मंत्री अधिवक्ता सुधीर जोशी-वंदूरकर यांनी कोल्हापूरला या नियोजनाचा बहुमान दिल्याविषयी आभार व्यक्त करत आगामी काळात अधिक व्यापक काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी जोतिबा डोंगर येथील सरपंच सौ. राधा बुणे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन यशस्वी होण्यासाठी सर्वश्री सुरेश रोकडे, अशोक रामचंदानी, पराग फडणीस, अक्षय ओतारी, राजेंद्र मकोटे यांसह अन्य कार्यकर्र्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.