गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील महंत मार्तंड पशुपती यांचा शिरच्छेद करण्याची धमकी
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील महंत मार्तंड पशुपती यांना बंगालच्या सिलीगुडी येथून मंजूर अहमद नावाच्या व्यक्तीने ‘तुम्ही हिंदुत्वाविषयी फार बोलता. इस्लाम सर्वोच्च आहे आणि राहील, इन्शाअल्लाह. तुम्हाला मिटवावे लागेल, तुमचा शिरच्छेद करावा लागेल. मोदी-योगी तुम्हाला वाचवू शकणार नाहीत’, अशी धमकी पत्राद्वारे दिली. महंतांनी ही माहिती साहिबााबाद पोलिसांना देऊन धमकी देणार्याला अटक करण्याची मागणी केली आहे. दोन मासांत महंतांना मिळालेली ही पाचवी धमकी असल्याचे सांगण्यात येत आहे. १७ ऑगस्ट २०२२ या दिवशीही महंत मार्तंड यांना पत्र पाठवून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली होती. मार्तंड पशुपती हे नेपाळच्या पशुपती आखाड्याचे महंत आहेत.
गाजियाबाद: पशुपति अखाड़े के महंत को मिली सिर तन से जुदा करने की धमकी, 1500 किमी दूर स्पीड पोस्ट से भेजी गई चिट्ठी#Ghaziabad #ThreatLetter
More Updates: https://t.co/YzXGNIJVIL
Must Watch: 👇👇https://t.co/vnTHOywH0U
— Zee Uttar Pradesh Uttarakhand (@ZEEUPUK) December 20, 2022
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांना महंतांना अशा धमक्या मिळणे अपेक्षित नाही. याप्रकरणी सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे ! |