विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या त्यागपत्राची मागणी !
|
नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी म्हणजे २१ डिसेंबर या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांनी विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन केले. या वेळी भाजपच्या आमदारांनी ‘साधू-संतांचा अवमान करणार्यांचा धिक्कार असो’, ‘विठ्ठलाचे नाही धरले पाय, या आघाडीचे करावे काय ?’, अशा घोषणा दिल्या, तर विरोधकांनी ‘भूखंड अपव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी त्यागपत्र द्यावे’, ‘भूखंडाचा श्रीखंड’, अशा घोषणा दिल्या. या वेळी भाजपच्या आमदारांनी डोक्यावर पांढरी गांधी टोपी घातली होती. विरोधकांनी विविध मागण्यांचे फलक हाती घेतले होते.
याच मागणीवरून २० डिसेंबरला विधान परिषदेत गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले होते.