‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ समाजातील प्रत्येकापर्यंत जायला हवा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
सांगली, २० डिसेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. संतोष देसाई यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची भेट घेऊन त्यांना हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट दिला. या प्रसंगी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी, ‘हा ग्रंथ समाजातील प्रत्येकापर्यंत जायला हवा’, असे मत व्यक्त केले.