श्रद्धा वालकरची हत्या करणार्या आफताबला फासावर लटकवा !
वणी येथे हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी !
वणी (यवतमाळ), २० डिसेंबर (वार्ता.) – श्रद्धा वालकर, निधी गुप्ता अशा अनेक हिंदु तरुणींची धर्मांधांनी निर्घृण हत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. श्रद्धाची हत्या करणारा क्रूर आणि वासनांध आफताब पुनावाला याला तात्काळ फासावर लटकवावे, अशी मागणी येथे आंदोलनाद्वारे करण्यात आली. हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी राज्यशासनाकडे केली. ‘नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्यात यावा’, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
आंदोलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, योग वेदांत सेवा समिती, राष्ट्रहित संवर्धन समिती, वणी फ्रेंड्स संघटना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांसह धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी सहभाग घेतला.
क्षणचित्रे
१. निवेदनावर स्वाक्षरी करणार्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती.
२. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वणी फ्रेंड्स क्लब यांच्या प्रमुखांनी आंदोलनाची छायाचित्रे त्यांच्या गटांवर पोस्ट करून अन्य सदस्यांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानुसार अनेकांनी आंदोलनास भेट देऊन उपस्थिती दर्शवली.
३. समाजसेवक श्री. नारायण गोडे यांनी आंदोलनात येऊन समाजाला सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी त्यांचे अन्य नियोजन रहित करून नागपूर येथील मोर्च्याला कार्यकर्त्यांसमवेत येणार असल्याचे सांगितले.
४. एका हितचिंतकाने आंदोलनासाठी मंडप आणि आसंद्या यांची व्यवस्था करून दिली.