आज जैन धर्मियांच्या वतीने ‘बारामती बंद’ !
बारामती – जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी या स्थळाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने २१ डिसेंबरला बंदचे आयोजन केले आहे. सर्व जैन बांधव दुकाने दिवसभर बंद ठेवतील. सकाळी १० वाजता तीन हत्ती चौकातील महावीर भवन ते गुणवडी चौक मार्गे उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघेल. जैन समाजाच्या भावनांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देणार आहे.