(म्हणे) ‘लव्ह जिहाद नावाची कोणतीही जमात भारतात नाही !’ – आमदार अबू आझमी, समाजवादी पक्ष
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – लव्ह जिहादवरून एका समाजाला वारंवार लक्ष्य केले जात आहे. लव्ह जिहाद नावाची कोणतीही जमात भारतात नाही, अशी वल्गना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत केली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर अबू आझमी बोलत होते.
या वेळी अबू आझमी म्हणाले, ‘‘श्रद्धा वालकर हत्येच्या प्रकरणात ‘आफताब’ हे नाव घेण्यात येत आहे; परंतु हा लव्ह जिहाद नाही, तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा प्रकार आहे. केरळ येथे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केलेल्या अन्वेषणामध्ये लव्ह जिहाद असल्याचे आढळलेले नाही. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मुळे भारतात १८ वर्षे पूर्ण झालेली युवती विवाह न करता अन्य पुरुषासमवेत राहू शकते. भारतीय संस्कृती सोडून आपण विदेशी संस्कृती अंगीकारत आहोत. (अन्य वेळी भारतीय संस्कृती न स्वीकारता इस्लामिक प्रथांचा अंगीकार करून सोयीनुसार भारतीय संस्कृतीचा दाखला देणारे अबू आझमी ! – संपादक) त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. ‘लव्ह जिहाद’वरून सभागृहाची दिशाभूल केली जात आहे.’’
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद नाही, तर मग मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी हिंदु युवतींवर बळजोरी करण्याचे प्रकार का घडत आहेत ? याचे उत्तर अबू आझमी देतील का ? |