सार्वजनिक ठिकाणी लघवी करू नये; म्हणून लावण्यात येणार्या देवतांच्या चित्रांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !
नवी देहली – सार्वजनिक ठिकाणी लघवी, थुंकणे किंवा कचरा फेकण्यापासून रोखण्यासाठी भिंतींवर देवतांची चित्रे चिकटवण्याची प्रथा बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
सार्वजनिक स्थानों पर देवी-देवताओं की फोटो लगाने पर कोर्ट ने कहा…https://t.co/sEQTYK9M0i
— ZEE HINDUSTAN (@ZeeHindustan_) December 19, 2022
१. या याचिकेत म्हटले होते की, लोकांना लघवी करणे, थुंकणे आणि कचरा फेकणे यांपासून रोखण्यासाठी देवतांची चित्रे भिंतीवर लावली जातात. ही प्रथा रूढ झाली आहे. हे भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ आणि २९५ अ चे उल्लंघन आहे; कारण त्यामुळे सर्वसामान्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. समाजासाठी हा एक गंभीर धोका आहे; कारण अशी चित्रे लावण्याने हे प्रकार थांबवण्याची हमी नाही, उलट लोक सार्वजनिक ठिकाणी या पवित्र प्रतिमांवर लघवी करतात किंवा थुंकतात.
२. याचिकाकर्ते आणि अधिवक्ता गौरांग गुप्ता म्हणाले की, लोकांना लघवी करणे किंवा थुंकणे यांपासून रोखण्यासाठी भीतीचा वापर केला जातो. एखाद्याच्या धर्मावरील श्रद्धेतून जन्माला आलेली भक्ती आणि त्याचे पालन करण्याचे स्वातंत्र्य लक्षात घेता अशा कृत्यांना अनुमती दिली जाऊ शकत नाही.
३. याचिकेत म्हटले होते की, उच्च न्यायालयाने यापूर्वीच्या एका प्रकरणात उघड्यावर लघवीची समस्या मान्य केली होती. न्यायालयाने याविषयीच्या आदेशात म्हटले होते की, भिंतींवर देवतांच्या प्रतिमा चिकटवण्याच्या प्रथेमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.