भारत-पाकिस्तान मतभेद सोडवण्यासाठी साहाय्य करण्यास अमेरिकेने दर्शवली सिद्धता
वॉशिंग्टन – भारत आणि पाकिस्तान यांच्यात विधायक संवादाची मागणी अमेरिकेने केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, दोन्ही देशांमधील चर्चा त्यांच्या लोकांच्या भल्यासाठीच असेल. अमेरिकेचा संबंध दोघांशीही भागीदारीचा आहे. अमेरिकेला दोन्ही देशांमध्ये शब्दयुद्ध नको आहे. भारत-पाकिस्तान मतभेद सोडवण्यासाठी साहाय्य करण्यास अमेरिका सिद्ध आहे.
अमेरिका के विदेश मंत्रालय के प्रवक्ता नेड प्राइस कहा कि दोनों देशों के साथ हमारी भागीदारी है और हम भारत और पाकिस्तान के बीच वाकयुद्ध नहीं देखना चाहते हैं. हम दोनों के बीच सार्थक संवाद देखना चाहते हैं-#NedPrice #Pakistan #India #America https://t.co/9vCmoA9Mov
— ABP News (@ABPNews) December 20, 2022
१९ डिसेंबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेड प्राइस म्हणाले की, भारतासमवेत आमची जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे. पाकिस्तानसमवेतही आमची भागीदारी आहे. दोन्ही देश अमेरिकेसाठी अपरिहार्य आहेत. दोन्ही देशांमधील मतभेद आहेत दूर करणे आवश्यक आहे, असेही प्राइस यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका‘भारताच्या अंतर्गत प्रश्नात नाक न खुपसता स्वतःच्या देशातील अराजकता अल्प करावी’, अशी तंबी भारताने अमेरिकेला दिली पाहिजे ! |