झारखंडमध्ये धर्मांधांकडून आदिवासी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार, हत्या आणि भूमी बळकावण्याच्या घटना !
आदिवासींच्या भूमी बळकावण्यासाठी धर्मांधांकडून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून लँड जिहाद !
रांची – झारखंडमधील आदिवासी भागांत मुसलमान तरुण आदिवासी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी विवाह करतात. नंतर त्यांच्या हत्या करून त्यांच्या नावावर असलेल्या भूमी बळकावतात. मुसलमान समाजातील अनेक तरुणांनी विवाहित असूनही आदिवासी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी विवाह केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
१. या विवाहांच्या नावाखाली मुसलमान समाजातील लोक जंगलात शिरकाव करतात. तसेच आदिवासी महिलांना नोकरी वगैरेचे आमीष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलतात.
२. झारखंडमधील पहाडिया आदिवासींच्या नावावर मोठ्या प्रमाणात भूमी आहे. अशा त्यांवर डोळा ठेवून मुसलमान तरुण या आदिवासी समाजातील मुलींशी विवाह करतात आणि नंतर त्यांच्या भूमी कह्यात घेतात.
३. बोरीओ परिसरात गेल्या वर्षभरात शंभरहून अधिक मुसलमान तरुणांनी आदिवासी मुलींशी प्रेमविवाह केल्याचे उघड झाले आहे.
४. भाजपचे नेते अमित मालवीय म्हणाले की, आदिवासी महिलेच्या हत्येकडे भारतात इस्लामिक सत्ता स्थापन करण्याचे एक कारस्थान म्हणून पाहिले पाहिजे. आदिवासी मुलींशी विवाह करून आदिवासी समाजात शिरकाव करणे नंतर तेथील स्थानिक निवडणुका जिंकणे, भूमी बळकावणे हा डावपेचांचा भाग आहे. आदिवासी महिलांच्या हत्येनंतर त्यांची मालमत्ता बिगर आदिवासी पतीची होते.
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद ही राष्ट्रीय समस्या घोषित करून त्याला रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, हेच यातून दिसून येते ! हे रोखण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ? |