जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी ठार
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील मुंझ मार्ग परिसरात २० डिसेंबरला पहाटे आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी ठार झाले. यांपैकी दोघांची ओळख पटली आहे, तर तिसर्याची ओळख पटवण्याची प्रक्रिया चालू आहे.
Shopian, J&K | Encounter underway between security forces and terrorists, 3 LeT terrorists killed at Munjh Marg area
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/ky2KqbDNbm
— ANI (@ANI) December 20, 2022
त्यांपैकी लतीफ लोन हा शोपिया येथील असून त्याचा पुराण कृष्ण भट या काश्मिरी हिंदूच्या हत्येमध्ये सहभाग होता. घटनास्थळावरून एक एके-४७ रायफल आणि दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.