विधानसभेच्या पायर्यांवर सत्ताधारी-विरोधक समोरासमोर आंदोलन !
|
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी अधिवेशनाच्या कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी प्रथम विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर बसून विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात निदर्शने केली, तर त्याच ठिकाणी सत्ताधार्यांकडूनही आंदोलन करण्यात आले. ‘जो हिंदु हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’, अशा घोषणा सत्ताधार्यांनी दिल्या. आंदोलनात सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांविरोधात घोषणा दिल्यामुळे विधानभवन परिसर दुमदुमला. ‘महाराष्ट्राची पिळवणूक गुजरातमध्ये गुंतवणूक, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पाठवणार्या मिंधे सरकारचा धिक्कार असो, गद्दारीचे पाप महाराष्ट्राला ताप, ५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. या वेळी शिंदे-भाजप गटातील आमदारांनी ‘साधूसंत, वारकरी आणि सावरकर यांचा अवमान करणार्यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा दिल्या.
विरोधकांची नौटंकी जनतेसमोर आणण्यासाठी भाजपचे आंदोलन !
भाजपचे आमदार प्रवीण दरेकर पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे विरोधक साधूसंत, वारकरी आणि सावरकर यांचा सतत अवमान करत आहेत. महापुरुषांचा अवमान करणारे विरोधक सत्ताधार्यांच्या विरोधात सतत चुकीचा आरोप करून टेंभा मिरवत आहेत. त्यामुळे विरोधकांची नौटंकी जनतेसमोर आणण्यासाठी भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.