विधीमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली’ हे ‘अॅप’ उपलब्ध !
मुंबई, २० डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र विधीमंडळ कामकाजाची दैनंदिन माहिती, बैठका, विविध योजना आदींची माहिती देणारे ‘महाअसेंब्ली’ (Maha Assembly) हे ‘अॅप’ उपलब्ध आहे, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत, तर उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी विधानपरिषदेत दिली.
विधिमंडळाचे दैनंदिन कामकाज, बैठका, विविध योजना आदींची माहिती देणाऱ्या ‘महाअसेंब्ली ॲप’चा सदस्यांनी वापर करावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत तर उपसभापती निलम गोर्हे यांनी विधानपरिषदेत केले.किनवट तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी हे ॲप तयार केले आहे. pic.twitter.com/LwXOND0f5q
— AIR News Pune (@airnews_pune) December 19, 2022
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी हे ‘अॅप सिद्ध केले असून विधीमंडळ कामकाजाविषयी माहिती मिळण्यासाठी सर्व सदस्यांनी या ‘अॅप’चा वापर करावा, असे आवाहन अध्यक्ष नार्वेकर आणि उपसभापती डॉ. गोर्हे यांनी केले आहे.