सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांनी काढलेल्या आकृत्यांचा सौ. अंजली रसाळ, जयसिंगपूर यांनी सूक्ष्मातून अनुभवलेला कार्यकारणभाव !
‘७.९.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पू. वामन राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, वय ४ वर्षे) यांनी ‘१० व्या अखिल भारतीय अधिवेशना’त सूक्ष्मस्तरावरील लढ्यात भाग घेतला’, हा लेख वाचतांना पू. वामन यांनी चौकोनात काढलेल्या १९३ आकृत्यांपैकी काही आकृत्या मी पहात होते. मला स्थुलातून कुठलीही आकृती एकसारखी दिसत नव्हती. प्रत्येक आकृतीचा आकार वेगवेगळा होता. आकृत्यांचे निरीक्षण करतांना माझ्याकडून गुरुदेवांना प्रार्थना झाली, ‘गुरुदेवा, या आकृत्या मला आध्यात्मिक स्तरावर अनुभवता येऊ देत.’ त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. मी आकृत्यांकडे पहात असतांना मला आध्यात्मिक लाभ होऊ लागले.
२. मला प्रत्येक आकृती शस्त्राप्रमाणे कार्य करत असल्याचे जाणवले.
त्यानंतर मी लेख वाचतांना, ‘या केवळ आकृत्या नाहीत, तर प्रत्येक देवतेची ती आयुधे आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
‘मला सूक्ष्मातील आकलन करण्याची शक्ती नसतांना आकृत्यांमागील सूक्ष्म कार्यकारणभाव अनुभवायला दिला’, याबद्दल माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– सौ. अंजली जयवंत रसाळ, जयसिंगपूर, जिल्हा सांगली. (२७.९.२०२२)
|