श्रीक्षेत्र अरण येथे संत काशिबा महाराज यांची पुण्यतिथी साजरी !
माढा (जिल्हा सोलापूर), १९ डिसेंबर (वार्ता.) – तालुक्यातील श्रीक्षेत्र अरण येथे राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने संत काशीबा गुरव महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. श्रीक्षेत्र अरण येथे संत काशिबा महाराजांचे समाधीस्थळ असून या समाधीस्थळावर महाअभिषेक करून अभिवादन करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे महासचिव मल्लिकार्जुन गुरव, सदस्य चंद्रकांत गुरव, ह.भ.प. देहूकर महाराज यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
संत काशीबा गुरव महाराज हे गुरव समाजातील एक महान संत होते. संत सावता माळी आणि संत काशीबा गुरव हे चांगले मित्र होते. शेतात काम करतांना संत सावता माळी भक्तीभावाने जे अभंग गात, ते संत काशीबा गुरव लिहून ठेवत असत.