(म्हणे) ‘सरस्वती शिशु मंदिरांचीही तपासणी झाली पाहिजे !’
काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांची हिंदुद्वेषी मागणी !
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश सरकार मदरशांत काय शिकवण्यात येत आहे, याची पडताळणी करणार आहे. यावरून काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना ‘सरस्वती शिशु मंदिरांचीही चौकशी झाली पाहिजे. हे समजले पाहिजे की, तेथे काय शिकवले जात आहे ?’, अशी मागणी केली. ‘केवळ मदरशांना लक्ष्य केले जात आहे. चौकशीतून मदरशांची स्थिती काय आहे, हे तरी लक्षात येईल. गेल्या ३ वर्षांपासून मदरशांना आर्थिक साहाय्य मिळालेले नाही’, असा दावाही त्यांनी केला.
कांग्रेस विधायक का आरोप- मदरसों को किया जा रहा टारगेट, सरस्वती मंदिरों की भी हो जांच#Congress #MadhyaPradeshNews #Madarsa https://t.co/YyDdKXyICd
— Zee MP-Chhattisgarh (@ZeeMPCG) December 19, 2022
‘मदरशांमध्ये देशद्रोहाचे शिक्षण दिले जात आहे का ?’, याची आम्हाला चिंता ! – संस्कृतीमंत्री उषा ठाकूर यांचे मसूद यांना प्रत्युत्तर
आरिफ मसूद यांच्या विधानावर राज्याच्या संस्कृतीमंत्री उषा ठाकूर म्हणाल्या की, ते सरस्वती शिशु मंदिराची चौकशी करू शकतात. आमच्या येथे सनातनचे संस्कार आहेत. ‘मदरशांमध्ये देशद्रोहाचे शिक्षण दिले जात आहे का ?’, ‘मानव तस्करी होत आहे का ?’, याची आम्हाला चिंता आहे. याची चौकशी झाली पाहिजे. ज्या मदरशांना सरकारकडून अनुमती देण्यात आलेली नाही, त्यांच्यावर नियंत्रण असले पाहिजे.
संपादकीय भूमिकासरस्वती शिशु मंदिरांतून कधीही आतंकवादी, वासनांध निर्माण होत नाहीत, हे जगजाहीर आहे, तसे मदरशांविषयी नाही, हे मसूद यांनाही ठाऊक आहे ! तरीही ते अशा प्रकारे विधान करून त्यांच्या मुसलमान मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत ! |