उत्तरप्रदेशातील फतेहपूर येथे धर्मांधाकडून विवाहित हिंदु महिलेवर बलात्कार
उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !
फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथील सलीम नावाच्या मुसलमान तरुणाने एका विवाहित हिंदु महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. सलीम याने ‘सोनू सिंह’ असे हिंदु नाव धारण करून पीडित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, असा आरोप पोलिसांत प्रविष्ट करण्यात आलेल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी सलीमला अटक केली आहे.
Fatehpur: धर्म छिपाकर युवती को प्रेम जाल में फंसाया, फिर किडनैप कर 3 दिनों तक किया रेप #fatehpur #uttarpradesh https://t.co/YJuq6kbNi7
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) December 18, 2022
१. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित हिंदु महिलेचा विवाह ३ वर्षांपूर्वी झाला होता. तिला २ वर्षांचा मुलगाही आहे. सासरच्या काही वादामुळे ती तिच्या माहेरी रहात होती. सलीमची भ्रमणभाषवरून पीडित तरुणीशी ओळख झाली. सलीमने स्वत:ची ओळख ‘सोनू सिंह’ या नावाने करून दिली.
२. १४ डिसेंबर या दिवशी सलीम याने महिलेला एका ठिकाणी बोलावले. सलीम तिला घेऊन एका घरात गेला. तेथे पीडित तरुणीला ‘सोनू’ हा ‘सलीम’ असल्याची माहिती मिळाली. पीडित तरुणीने घराबाहेर पडायचा प्रयत्न केला; मात्र सलीमने तिला ओलीस ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला.
३. सलीम याने तरुणीवर विवाह आणि धर्मांतर यांसाठी दबाव टाकला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मुलगी काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत प्रविष्ट केली. पोलिसांनी तरुणीचा शोध चालू केला. अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर अंततः पोलिसांना पीडित तरुणी सापडली. पोलिसांनी मुलीला तिच्या कुटुंबियांकडे सोपवले.
संपादकीय भूमिकाअशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! |