कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र लावल्याने काँग्रेसचा थयथयाट !
बेळगाव – कर्नाटकातील भाजप सरकारने येथील विधानसभेच्या सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र लावले. त्याचे अनावरण १९ डिसेंबरला करण्यात आले. याला काँग्रेसने विरोध केला. विरोधी पक्षनेते सिद्धारामय्या आणि अन्य नेते यांनी विधानसभेबाहेर या विरोधात धरणे आंदोलन केले.
Veer Savarkar’s portrait unveiled in Karnataka Assembly hall, Congress-led opposition stages a protest outsidehttps://t.co/gfe5QjhrSC
— OpIndia.com (@OpIndia_com) December 19, 2022
१. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार डी.के. शिवकुमार म्हणाले की, आम्ही सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सूत्रे उपस्थित करणार होतो, त्यामुळेच त्यांनी हे छायाचित्र आणून वाद निर्माण केला आहे. सरकारकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही.
२. विरोधी पक्षानेते सिद्धारामय्या यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून ‘विधानसभेत वाल्मीकि ऋषि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आदींची चित्रे लावावीत’, अशी मागणी केली. सावरकर एक वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे. त्यांचा म. गांधी यांच्या हत्येत सहभाग होता. (न्यायालयाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गांधी हत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्त केलेले आहे. काँग्रेसवाल्यांचा न्यायालयावर विश्वास नाही, हेेच यावरून स्पष्ट होते ! – संपादक)
संपादकीय भूमिकाराष्ट्रघातकी काँग्रेसने प्रखर राष्ट्रभक्त असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा द्वेष करणे, यात आश्चर्य ते काय ? |