नागपूर येथे विधानभवनावर धडकणार लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ !
हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांची माहिती
नागपूर – महाराष्ट्रातील हिंदु तरुणी श्रद्धा वालकर हिचे आफताब पूनावाला याने ३५ तुकडे केल्यानंतर ते प्रकरण शांत होत नाही, तोच झारखंड राज्यातील रिबिका या हिंदु तरुणीचे दिलदार अन्सारी याने ५० तुकडे केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अशा १-२ घटना नसून असंख्य घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. ही वेळ आपल्या मुलींवर येऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच दुसरीकडे देशात छळ, बळ, कपट यांद्वारे हिंदूंचे वाढते धर्मांतर नव्या राष्ट्रांतराला जन्म देऊ शकते. हे राष्ट्रघातकी ‘धर्मांतर’ आणि ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी येथे हिंदु जनजागृती समिती, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि समाज यांच्या वतीने २१ डिसेंबर या दिवशी नागपूर विधानभवनावर राज्यस्तरीय ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात विदर्भासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून संत, धर्माचार्य, संप्रदायाचे प्रमुख, हिंदु संघटना आणि विविध ज्ञाती समाज सहभागी होणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली.
१. या संदर्भात नागपूर येथील ‘अखिल भारतीय माहेश्वरी समाजभवन’ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित दुसर्या बैठकीला श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, रजपूत करणी सेना, राष्ट्रीय युवा गठबंधन, पुरोहित संघटना, सनातन संस्था, बजरंग दल आदी विविध संघटना, तसेच अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.
२. या वेळी संपूर्ण विदर्भात मोर्च्याविषयी चालू असलेले संपर्क अन् जागृती अभियान यांचा आढावा मांडण्यात आला.
चलो नागपुर! चलो नागपुर! चलो नागपूर !
भव्य राज्यव्यापी मोर्चा
*🚩 हिंदू जनसंघर्ष मोर्चा 🚩
श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र व छत्तीसगढ राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती द्वारा लव्ह जिहाद विरोधी तथा धर्मांतरणबंदी कानून लागू करने राज्यव्यापी आंदोलन में समस्त हिंदूओ को सहभागी होने का जाहिर आवाहन ! ✊
समय : दोपहर 12 बजे
दिनांक : 21 दिसंबर, 2022
स्थान : यशवंत स्टेडियम, धंतोली से विधान भवन नागपूर.
३. मोर्च्याद्वारे हिंदूंचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी प्रत्येकाने ‘आता नाही, तर कधीच नाही’ हा निर्धार करून अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोचण्याचा निर्धार केला आहे. अशा बैठका प्रत्येक संघटनेकडून घेतल्या जात आहेत.
४. नागपूरमधील काही प्रमुख गर्दीच्या ठिकाणी ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधातील मोर्च्यात मी सहभागी होत आहे, तुम्हीही सहभागी व्हा !’, असे आवाहन करणारे ‘सेल्फी पॉईंट’ उभारण्यात आले आहेत. येथे तरुण-तरुणी येऊन सेल्फी (स्वतःनेच स्वतःचे छायाचित्र काढणे), तसेच व्हिडिओ काढून स्वत:च्या व्हॉटस्अॅप, ट्विटर, फेसबुक आदी सामाजिक माध्यमांमध्ये पोस्ट करत होते. या अभिनव उपक्रमाद्वारे सहस्रो लोकांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
हे वाचा –
नागपूर येथे लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात २१ डिसेंबरला भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्च्याचे आयोजन !
https://sanatanprabhat.org/marathi/637357.html
५. ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा’ करण्यात यावा, या मागणीसाठी स्वाक्षरी अभियानही राबवण्यात आले.
६. शेकडो रिक्शांवर मोठी पत्रके चिकटवणे, सहस्रो हस्तपत्रकांचे वितरण करणे, फलक लावणे, होर्डिंग्ज लावणे, प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘व्हिडिओ क्लिप’द्वारे सामाजिक संकेतस्थळांवरून आवाहन करणे, विदर्भातील सर्व जिल्ह्यांत धरणे आंदोलनाच्या माध्यमांतून जागृती करणे, प्रशासनाला निवेदने देणे, तसेच विदर्भातील माहेश्वरी, जैन, ब्राह्मण, खाटिक आदी विविध समाजाच्या वा संघटनांच्या प्रमुखांना भेटून त्या त्या समाजात जागृती केली जात आहे. ठिकठिकाणच्या धार्मिक कार्यक्रमांत जाऊन सर्वांना मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.
या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी ९३७३५३६३७० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.