पाकिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांकडून पोलीस ठाण्यावर नियंत्रण मिळवून आतंकवाद्यांची सुटका !
९ पोलीस अधिकार्यांना ठेवले ओलीस !
खैबर पैख्तुनख्वा (पाकिस्तान) – ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टी.टी.पी.) या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी बन्नू कॅन्टोन्मेंटमध्ये घुसखोरी करत एका पोलीस ठाण्यावर नियंत्रण मिळवले. येथे त्यांनी अटकेतील आतंकवाद्यांची सुटका केली, तर ९ पोलिसांना ओलीस बनवून ठेवले आहे.
There is a hostage situation ongoing at the Counter-terrorism Department installation at Bannu Cantonment, an official said.#Taliban #Pakistanhttps://t.co/Jgcx9XYFJP
— ABP LIVE (@abplive) December 19, 2022
या घटनेची माहिती मिळताच पाकिस्तान सैन्याला येथे पाठवण्यात आल्यावर त्याने या परिसराला घेराव घातला आहे. तालिबानी आतंकवाद्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला असून ‘आमच्याकडे ९ पोलीस अधिकारी ओलीस असून आकाशमार्गाने अफगाणिस्तानला जाण्याची व्यवस्था करा’, अशी मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाज्या प्रमाणे पाक भारतात आतंकवादी घुसवून आक्रमणे करतो, त्याचप्रमाणे तालिबानी आतंकवादी पाकमध्ये घुसून पाकला जेरीस आणत आहेत ! ‘जसे आपण करतो, तसे भोगतो’, याचाच प्रत्यय पाकला सध्या येत आहे ! |