दौंड (पुणे) येथे विवाहित हिंदु तरुणाची ‘सुंता’ करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न !
२ धर्मांध आणि एका आधुनिक वैद्य यांविरोधात गुन्हा नोंद
दौंड (जिल्हा पुणे) – येथील विवाहित तरुण बबलू चव्हाण या तरुणाची ‘सुंता’ (मुस्लिम धार्मिक विधी) करून बळजोरीने धर्मांतर करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कुमेल कुरेशी उपाख्य हाजीसाहब, आसिफ शेख आणि एका आधुनिक वैद्य यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे ३ संशयित आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध चालू असल्याचे दौंडचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले.
मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने पुणे जिल्ह्यात हिंदू तरुणाची जबरदस्तीने केली सुंता @mieknathshinde#Maharashtra #Police #forcefulconversioniscrime #circumcision #दौंड #forcefulconversion #PuneRural #Daund #Atrocity https://t.co/FT7ypP3Dy9
— PRAFULL M. BHANDARI (@PRAFULL999) December 17, 2022
याविषयी पोलिसांनी सांगितले, बबलू याने वर्ष २०१८ मध्ये एका विधवा असलेल्या मुसलमान महिलेसमवेत कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) येथे लग्न केले होते. हे दोघेही दौंड येथील भीमा नदीकाठावरील वीटभट्टीत काम करत आहेत. कुमेल कुरेशी आणि त्याचे साथीदार सदर महिलेला घटस्फोट घेण्यास सांगत होते; परंतु त्या महिलेने त्याला नकार दिला. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२२ या दिवशी त्यांनी बबलू याची बळजोरीने ‘सुंता’ केली. या प्रकारानंतर दहशतीखाली असलेले चव्हाण कुटुंब भीतीपोटी दौंड सोडून गेले होते.
संपादकीय भूमिकाधर्मांध हिंदु मुलींसमवेत आता हिंदु तरुणांचेही धर्मांतर करत आहेत, हे हिंदूंच्या असित्वासाठी धोकादायक आहे. हिंदु तरुण आणि तरुणी यांचे प्रबोधन करण्यासमवेत त्यांना धर्मशिक्षण देणेही आवश्यक आहे ! |