अल्पवयीन युवतीचा विनयभंग करणार्या शकील शेखला ५ जिल्ह्यांतून हद्दपार करा !
विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांचे निवेदन
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – इचलकरंजी येथे शकील हुसेन शेख या रिक्शाचालकाने एका अल्पवयीन युवतीला त्याच्या मालकीच्या रिक्शात बळजोरीने बसवून निर्जनस्थळी नेऊन विनयभंग केला. या प्रकरणी शकील शेख याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तरी या प्रकरणी शकील शेख याचा रिक्शाचा परवाना, भ्रमणभाष जप्त करून कोल्हापूर जिल्ह्यासह ५ जिल्ह्यांतून त्याला हद्दपार करावे, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.