निवळ छंद म्हणून नव्हे, तर भावी भीषण आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून लागवड करा !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेच्या अंतर्गत नियमित प्रकाशित होणार्या चौकटींचे ५० भाग आज पूर्ण होत आहेत. ही लेखमाला पुढेही चालू रहाणार आहे. या चौकटींविषयी अनेकांनी सकारात्मक अभिप्राय कळवले. अनेकांनी स्वतःच्या घराजवळ जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पती आणि भाजीपाला यांची लागवड करण्यास आरंभ केला. ‘घरच्या घरी भाजीपाला लागवड करणे, ही काळाची आवश्यकता आहे’, हे आतापर्यंतच्या लेखांतून आपण समजून घेतलेलेच आहे. समाजामध्ये छंद म्हणून लागवड करणारे अनेक जण आहेत; परंतु भावी भीषण आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून ही लागवड मोहीम सनातनने चालू केली आहे. या मोहिमेमागे संतांचा संकल्प कार्यरत आहे. सर्वांनी या लागवड सेवेतून कृतज्ञताभावात राहून निसर्गरूपी भगवंताकडून शिकण्याचा आणि चैतन्य ग्रहण करण्याचा आनंद अनुभवावा. ‘निवळ तात्त्विक माहितीपेक्षा प्रत्यक्ष केलेल्या कृतीतील आनंद पुष्कळ मोठा असतो’, हे लक्षात घेऊन अजूनपर्यंत घरी लागवड केली नसल्यास आजच कृतीला आरंभ करावा.
लागवडीविषयीचे तुमचे प्रश्न, तसेच वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आम्हाला lagvadseva@gmail.com या पत्त्यावर अवश्य पाठवावेत.
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (६.१२.२०२२) ॐ