सातारा येथे भाजपच्या वतीने आंदोलन करत पाकिस्तानचा निषेध !
सातारा, १८ डिसेंबर (वार्ता.) – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. हे केवळ पंतप्रधान मोदी यांच्यावरच नव्हे, तर संपूर्ण भारतीय अस्मितेवरील आक्रमण आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने झरदारी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत शहरातील शिवतीर्थावर (पोवई नाका येथे) आंदोलन केले. या वेळी पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम्’ अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत पाकिस्तानचा झेंडा आणि झरदारी यांचा पुतळाही जाळला. आंदोलनामध्ये शहर परिसरातील २५ हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.